जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…त्या शिक्षक परिषदेस शिक्षकांचा प्रतिसाद

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्य शिक्षक परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या राहाता येथील नाशिक विभागीय कार्यकर्ता बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी नाशिक विभागीय कार्यकारिणी घोषित करण्यात आली ती अशी अध्यक्ष-राजेंद्र जायभाये (पाथर्डी -अहमदनगर),उपाध्यक्ष-कविराज पाटील (मुक्ताईनगर-जळगाव),उपाध्यक्ष राकेश आव्हाड (नंदुरबार),उपाध्यक्ष शंकर गाडेकर (राहुरी -अहमदनगर)
उपाध्यक्ष खंडेराव उदे (नेवासा-अहमदनगर),कार्यवाह- रामकृष्ण बागल(नंदुरबार),कार्याध्यक्ष – भूषण गंगाधर चौधरी (रावेर-जळगाव),कार्याध्यक्ष – मिलिंद तनपुरे ( कर्जत-अहमदनगर),सहकार्यवाह -राजेंद्र थोरात( राहाता),सहकार्यवाह- बाबासाहेब पवार (नगर-अहमदनगर),सहकार्यवाह- मनोज साहेबराव चव्हाण (जळगांव) आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर आगामी काळात लढा देण्याचा निर्धार मान्यवरांनी केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या प्राथमिक विभागाची उत्तर महाराष्ट्र (नाशिक) विभागीय कार्यकर्ता बैठक २२नोव्हेंबर रोजी राहाता येथे नुकतीच संपन्न झाली आहे. सकाळी पहिल्या सत्रात संघटनेचे प्रांत अध्यक्ष वेणूनाथ कडू अध्यक्षस्थानी होते.प्रमुख वक्ते म्हणून संघटनेचे राज्य संघटनमंत्री (नांदेड) सुरेश दंडवते यांनी संघटनेचा कार्यकर्ता कसा असावा, कार्यकर्त्यांची कार्यशैली कशी असावी,कार्यकर्त्यांच्या अंगी कुठले गुण असावेत, कार्यकर्त्यांनी आपले व्यक्तीगत चरित्र कसे घडवावे, संघटनेच काम कसे करावे,यावर तसेच संघटनेमधील पदाधिकारी,संघटनेची ध्येयधोरणे,उद्दिष्टे तसेच कार्यकत्यार्ची कार्यशैली कशी असावी याबाबत मार्गदर्शन केले आहे.
दुसऱ्या बौद्धिक सत्राचे अध्यक्ष संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब रोहकले होते. प्रमुख वक्ते राज्य कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे यांनी संघटनांचे आंदोलन, प्रशासकीय बाबींचा अभ्यास कसा असावा, आपले प्रश्न कशा पद्धतीने मांडावेत यावर मार्गदर्शन केले.
राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.भविष्यात प्रलंबित प्रश्न कशा पद्धतीने मार्गी लावावीत, तसेच वेतन प्रणाली, जुनी पेन्शन, मुख्यालयी राहण्याचा प्रश्न, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी पदे सरळ पदोन्नती मधून शिक्षकांतून भरणे, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांचे प्रश्न, जीपीएफची प्रकरणे,शिक्षकांना वेतन वाढ,बदली शिक्षकांचे जॉब कार्ड अशा प्रश्नांवर सविस्त मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक आमदार संजय केळकर होते.

यावेळी प्रांताध्यक्ष वेणूनाथ कडू, राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, आदर्श शैक्षणिक समूह पनवेलचे चेअरमन धनराज विसपुते,राहाता पंचायत समितीचे सभापती जपे, राज्य कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे,बाबुराव पवार,राज्य संघटनमंत्री सुरेश दंडवते,राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब रोहकले गुरुजी राज्य संपर्क प्रमुख,दिलीप पाटील,राज्य सहकार्यवाह पुरुषोत्तम काळे,राज्य उपाध्यक्ष संजय शेळके,राहाता गट शिक्षणाधिकारी काळे,राज्य प्रसिद्धीप्रमुख रविकिरण पालवे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय शेळके यांनी, तर स्वागत जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे यांनी केले.
धनराज विसपुते यांच्या वाढदिवसानिमित्त आ.संजय केळकर यांनी त्यांचा सत्कार केला आहे.
अध्यक्षीय भाषणात आ. केळकर म्हणाले की,” शिक्षकांच्या न्याय हक्क,प्रश्नांसाठी लढणारी संघटना म्हणून महाराष्ट्रात अल्पावधीतच सर्व शिक्षकांच्या मनात रुजलेली संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग परिचित आहे.आपण चांगले काम करतो म्हणून चांगले लोक आपल्या सोबत येत आहेत.यापुढेही अनेक लोक आपल्या सोबत येतील.आपली संघटना राष्ट्रहित,शिक्षण व शिक्षकहित जोपासणारी आहे.
कार्यक्रमास संगमनेर नगरपरिषद च्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी धावती भेट दिली.तसेच प्रवरानगर साखर कारखान्याचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व इतर अन्य राजकीय व सामाजिक पदाधिकारी यांनीही आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या आहे.
बैठकीचे संचालन सहकार्यवाह पुरुषोत्तम काळे व सहसंचालन रविकिरण पालवे यांनी केले.मेळाव्याचे सूत्र संचलन दत्तात्रय गायकवाड,गणेश पिंगळे,दत्तात्रय गमे यांनी केले.संजय शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक नेते रावसाहेब रोहकले, जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे,दत्तात्रय गमे,राहाता तालुकाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड,तोरणे सर,फेसबुक व यूट्यूबवर लाईव्ह कार्यक्रम करणारे बनसोडे सर,अप्रतिम रांगोळी काढणारे चित्रकार वाघमारे सर,शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र थोरात,तसेच जिल्हा गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष विकास डावखरे, विकास मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे व इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या वेळी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close