जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

तरुणाचा मृतदेह,कोपरगाव तालुक्यात खळबळ !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथील रहिवासी असलेला व सिन्नर मुसळगाव औद्योगिक वसाहतीत खाजगी कारखान्यात नोकरीस असलेला तरुण गणेश सूर्यभान वहाडणे (वय-३४) याचा गोदावरी नदीपात्रात नुकताच मृतदेह आढळला असून त्याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांची आपल्या  दप्तरी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मयत गणेश सूर्यभान वहाडणे याचे छायाचित्र.

  

मयत तरुण गणेश वहाडणे हा शुक्रवार दि.२० ऑक्टोबर रोजी सायंकाळी घरी आला नाही.मात्र त्याची दुचाकी गोदावरी नदीवरील पुलावर दुसऱ्या दिवशी संशयास्पद रित्या आढळून आली होती.गावातील ग्रामस्थानी ती ओळ्खल्यावर सदर बेपत्ता तरुणांचा शोध चालू केला असता तो सोनारी ष आवारात नदी पात्रात आढळून आला आहे.

सदरची सविस्तर वृत्त असे की,मयत तरुण गणेश सूर्यभान वहाडणे हा सिन्नर येथील मुसळगाव औद्योगिक वसाहतीत एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत होता.तो सप्ताहात दर शुक्रवारी घरी येत होता.एरवी तो सिन्नर येथे आपल्या कामाच्या ठिकाणी मुक्कामी राहात होता.मात्र या शुक्रवार दि.२० ऑक्टोबर रोजी सायंकाळी घरी आला नाही.मात्र त्याची दुचाकी हि गोदावरी नदीवरील पुलावर चावी लावलेल्या स्थितीत दुसऱ्या दिवशी संशयास्पद रित्या आढळून आली होती.गावातील ग्रामस्थानी ती ओळ्खल्यावर सदर बेपत्ता तरुणांचा शोध चालू केला असता.तो मिळून आला नाही.त्यामुळे सदरची घटना चिंताजनक ठरली होती.या बाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली होती.


    दरम्यान  पोलिसांनी पाचारण केलेल्या आपत्कालीन पथकाने त्याचा शोध सुरु केला होता.मात्र तो शनिवारी आढळून आला नाही.मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज पुन्हा एकदा हा शोध सुरु ठेवल्यावर सदर तरुणांचा मृतदेह सोनारी ग्रामपंचायत हद्दीत गट क्रं.०४ जवळ गोदावरी नदीत काठी आढळून आला होता.त्याची खबर धारणगाव आणि परिसरात वाऱ्यासारखी पसरली होती.

    दरम्यान पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन त्यास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.त्यानंतर आज दुपारी तिनच्या त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

   त्यामुळे हि आत्महत्या की घातपात यांबाबत धारणगाव आणि परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
मयत तरुण गणेश वहाडणे याच्या पश्चात पत्नी,एक ०८ महिन्याची मुलगी,आई,दोन भाऊ,बहीण असा परिवार आहे.
दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल,सहाय्यक फौजदार ए.एम.आंधळे हे करत आहेत.

   दरम्यान या प्रकरणी खबर देणार आप्पासाहेब कचरू वहाडणे (वय-४६) रा.धारणगाव यांनी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.७०/२०२३ सी.आर.पी.सी.१७४ अन्वये केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आंधळे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close