निवड
…या वकील संघाची निवडणुक बिनविरोध!

न्युजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगांव वकिल संघ निवडणूकीत काल नामनिर्देशन मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेकांनी आपली तलवार म्यान केल्याने यात अध्यक्ष पदासाठी अॅड.शरद मारुती गुजर यांची बिनविरोध निवड झाली आहे तर उपाध्यक्षपदी अॅड.महेश सुरेशराव भिडे तर चिव पदी अॅड.परेश श्रीनिवास डागा तर महिला उपाध्यक्ष पदी अॅड.सविता निवृत्ती कदम यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी ऍड.अशोकराव वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

दरम्यान काल माघारीपूर्वी कोपरगाव वकील संघाच्या सर्व सदस्यांची एक बैठक बोलावून वकील संघाची बिनविरोध निवडणूक होण्याची मोठी परंपरा जपण्याचे आवाहन केलं होतं त्याला जेष्ठ कनिष्ठ सदस्यांनी दुजोरा देऊन ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यात सहयोग दिल्याने हा जनता जनार्दनाचा रथ पुढे गेला असल्याची माहिती मावळते अध्यक्ष अशोकराव वहाडणे यांनी दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव येथील जिल्हा व प्रथम वर्ग न्यायालयात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या कोपरगांव वकील संघाची निवडणूक जाहीर झाली होती. नामनिर्देशन भरण्याची अखेरच्या दिवशी अध्यक्षपदासाठी ०६ अर्ज तर उपाध्यक्ष,महिला उपाध्यक्ष व सचिव,सहसचिव पदासाठी प्रत्येकी ०१ तर खजिनदार पदासाठी ०२ अर्ज आले होते.ही निवडणूक दि.१९ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी ०४ पर्यंत संपन्न होणार होती तर आपले नामनिर्देशन मागे घेण्याची अखेरची मुदत काल अखेर म्हणजेच १४ जुलै रोजी होती.दरम्यान या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार ऍड.एस.एम.गुजर जी.जी.गुरसळ,आर.जे.शेख (अत्तार), सी.एम.वाबळे,पी.एस.चांदगुडे आणि महिला उमेदवार आर.के.भोंगळे आदी सहा जण रणांगणात उतरले होते मात्र यातील ऍड.एस.एम.गुजर वगळता अन्य पाच जणांनी आपली तलवार म्यान केल्याने ऍड.गुजर यांचा रस्ता साफ झाला होता.तर वकील संघाच्या उपाध्यक्ष पदासाठी ॲड.एस.एम.भिडे यांचा तर सचिव पदासाठी परेश श्रीराम डागा,सहसचिव पदासाठी महेंद्र आर.जाधव महिला उपाध्यक्ष पदासाठी सविता निवृत्ती कदम यांचे प्रत्येकी एकच अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्यात जमा असल्याचे आमच्या प्रतिनिधीने याआधीच जाहीर केले होते.त्याप्रमाणे वरील सर्व पदाधिकारी बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक अधिकारी वहाडणे यांनी जाहीर केले आहे.
उर्वरित उपाध्यक्ष,सचिव,सहसचिव,खजिनदार व महिला उपाध्यक्ष या पदांकरीता संपन्न होत होत होती.

दरम्यान खजिनदार पदासाठी दोन अर्ज होते
त्यात एन.पी.गिरमे व जी.जी.सुरभैय्या यांची नावे होती त्यातील सुरभैय्या यांनी पिछे मूड केल्याने ऍड.एन.पी.गिरमे यांची बिनविरोध निवडीची वाट मोकळी झाली होती.सहसचिव पदासाठी एकच अर्ज दाखल असल्याने ऍड.जाधव यांचा गुलाल आधीच झाला होता केवळ औपचारिक घोषणा बाकी होती.तीही झाल्याने सर्वच निवडणूक बिनविरोध पार पडल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे जेष्ठ पदाधिकारी यांनी केलेल्या प्रयत्नास यश येऊन ही निवडणूक बिनविरोध संपन्न झाली असून आहे.

दरम्यान या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विद्यमान अध्यक्ष ॲड.अशोकराव वहाडणे,सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲड.राहुल चव्हाण,ॲड.प्रताप निंबाळकर, ॲड.सौ.एस.आर.मैले,ॲड.आर.सी.गव्हाणे आदीनी काम पाहिले आहे.त्यांनी सर्व सदस्यांची एक बैठक बोलावून वकील संघाची बिनविरोध निवडणूक होण्याची मोठी परंपरा जपण्याचे आवाहन केलं होतं त्याला जेष्ठ कनिष्ठ सदस्यांनी दुजोरा देऊन ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यात सहयोग दिल्याने हा जनता जनार्दनाचा रथ पुढे गेला असल्याची माहिती मावळते अध्यक्ष अशोकराव वहाडणे यांनी दिली आहे.
दरम्यान या निवडणुकीत विजयी व बिनविरोध अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव,खजिनदार,सहसचिव आदीं पदाधिकाऱ्यांचे वकील संघाचे माजी अध्यक्ष जयंत जोशी,ऍड.शंतनू धोर्डे,ऍड.एस.एम.वाघ,ऍड.मच्छीन्द्र खिलारी,ऍड.अशोक टूपके,ऍड.दिलीप लासुरे,ऍड.प्रदीप रणधीर,ऍड.योगेश खलकर आदींसह अनेकांनी अभिनंदन केलं आहे.