आरोग्य
…या महाविद्यालयाचे वतीने फार्मसी जनजागृती रॅलीचे आयोजन

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
फार्मसी सप्ताहाच्या निमित्ताने कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने नागरिकांमध्ये औषधांचा योग्य व जबाबदारीने वापर,प्रतिजैविकांचा विवेकपूर्ण वापर,स्वयंऔषधोपचाराचे दुष्परिणाम तसेच फार्मासिस्टच्या आरोग्यसेवेतील महत्त्वपूर्ण भूमिकेबाबत विद्यार्थ्यांनी जनजागृती करण्यासाठी फार्मसी जनजागृती रॅलीचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी “स्वयंऔषधोपचाराला नकार द्या फार्मासिस्टचा सल्ला घ्या,औषध घेण्यापूर्वी विचार करा फार्मासिस्टचा सल्ला घ्या,योग्य औषध,योग्य मात्रा,योग्य वेळी निरोगी जीवनासाठी अत्यावश्यक,फार्मासिस्ट तुमचे औषध तज्ज्ञ,तुमच्या आरोग्याचे विश्वासू भागीदार,सुरक्षित औषधे,निरोगी नागरिक,सशक्त भारत अशा विविध जनजागृतीपर घोषवाक्ये देत जनमानसात जागृती करण्यात आली आहे.या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
‘राष्ट्रीय फार्मसी सप्ताह ‘हा भारतातील आरोग्य सेवा आणि औषधनिर्माण क्षेत्रात काम करणाऱ्या फार्मासिस्टच्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी साजरा केला जातो.हा सप्ताह साधारणपणे नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन’द्वारे आयोजित केला जातो.यासोबतच,जागतिक स्तरावर २५ सप्टेंबर रोजी ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’ निमित्त देखील फार्मसी सप्ताहाचे आयोजन केले जाते.सामान्य जनतेमध्ये औषधांच्या सुरक्षित आणि योग्य वापराबाबत जागृती निर्माण करणे.डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून फार्मासिस्ट बजावत असलेल्या भूमिकेची समाजाला जाणीव करून देणे.आरोग्य सेवा प्रणालीमध्ये औषधोपचाराचे परिणाम सुधारण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आणि उपायांवर चर्चा करणे आदी उद्देश त्यासाठी निर्धारित करण्यात आलेले आहे.त्याबाबत कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण या ठिकाणी असलेल्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने हा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
सदर प्रसंगी आर.जे.एस.फार्मसीचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नितीन जैन तसेच उपप्राचार्या डॉ.उषा जैन,प्रा.प्रविण करडक,प्रा.करवीर आघाडे,प्रा.सचिन चव्हाण,प्रा.रुद्रेश रत्नपारखी,प्रा.कांचन गुरसळ,प्रा.सोनाली कोते,प्रा.पूजा जाधव,प्रा.मेघना रायजादे, प्रा.अक्षदा वाघचौरे,प्रा.वैभव गाढवे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
या प्रचार फेरीचे उद्घाटन कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश वाणी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्यांनी औषधांच्या योग्य वापराबाबत जनजागृती करणे तसेच रुग्णांना औषधांच्या वापराबाबत योग्य मार्गदर्शन व सल्ला देण्यामध्ये फार्मासिस्टची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले आहे.
त्यावेळी विद्यार्थ्यांनी,”स्वयंऔषधोपचाराला नकार द्या फार्मासिस्टचा सल्ला घ्या,औषध घेण्यापूर्वी विचार करा फार्मासिस्टचा सल्ला घ्या,योग्य औषध,योग्य मात्रा,योग्य वेळी निरोगी जीवनासाठी अत्यावश्यक,फार्मासिस्ट तुमचे औषध तज्ज्ञ,तुमच्या आरोग्याचे विश्वासू भागीदार,सुरक्षित औषधे,निरोगी नागरिक,सशक्त भारत अशा विविध जनजागृतीपर घोषवाक्ये देत जनमानसात जागृती करण्यात आली आहे.या उपक्रमाचे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष चांगदेव कातकडे,सचिव प्रसाद कातकडे आदींनी स्वागत केले आहे.



