जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगावात मारक्या गाईचा प्रताप,चार जखमी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व उपनगरांमध्ये वर्तमानात रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असून आज एका मारक्या गाईने चार जणांना लोळवल्याने कहर झाला असून चार जणांना दवाखान्याचा आसरा घ्यावा लागण्याचा अनास्था प्रसंग गुदरला आहे.त्यामुळे या मारक्या प्राण्यांचा बंदोबस्त नागरपरिषदेन करावा अशी मागणी माजी गटनेते विरेन बोरावके यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

दोन्ही संकल्पित छायाचित्र.

“शहरातील मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम नगरपालिकेकडून सातत्याने राबवली जात नसल्याने या जनावरांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.रस्त्यांवरील या जनावरांमुळे सामान्य माणूस मात्र त्रस्त झाला असून अपघात वाढत आहे.त्यांचा बंदोबस्त पालिकेने त्वरित करावा”-विरेन बोरावके,माजी गटनेते,कोपरगाव नगरपरिषद.

मागील अनेक दिवसांपासून पाळीव प्राणी आणि मोकाट जनावरांचा कोपरगाव शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर त्रास वाढत असताना त्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत नाहीत.नगर-मनमाड,धारणगाव-कोपरगाव,मुख्य रस्ता,छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.आंबेडकर,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोर,विघ्नेश्वर चौक,तहसील चौक,एस.जी.शाळा,कन्या शाळा,बँक रोड,गोदामगल्ली,महात्मा गांधी,कोर्ट रोड,वीर सावरकर चौक,इंदिरा पथ रस्ता,गोदावरी पेट्रोल पंप,येवला नाका,गांधीनगर अशा प्रमुख मार्गांसह शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी विविध उपनगरातील चौक आदी वेगवेगळ्या भागांमधील रस्त्यांवर तर जणू काही ठिकाणी जनावरांचे साम्राज्य असल्यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
गांधी चौक,मुख्य रस्ता,डॉ.आंबेडकर चौक या रस्त्यावर तर कायम मोकाट जनावरे दिसतात.या रस्त्यावर शाळा महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी,शिक्षक,नागरिक,विविध रुग्णालयात,तहसील पंचायत समिती,बँकात जाणाऱ्या नागरिकांची सातत्याने गर्दी असते.त्यामुळे या रस्त्यावर सातत्याने वर्दळ असते; मात्र,या रस्त्यावर मोकाट जनावरे फिरत असल्यामुळे येथे अनेकदा वाहनचालकांना अचानक ब्रेक मारावा लागतो.त्यामधून अनेक अपघात झाले आहे तर पुढील काळात अपघात होण्याचा धोकाही वाढला आहे.याभागात जनावरे रस्त्याच्या मधोमध बसलेली असल्यामुळे अनेकदा वाहतूक खोळंबते.
विविध चौक याभागातही मोकाट जनावरांचे कळप मोठ्या प्रमाणात दिसतात.गुरुद्वारा रोड व बँक रोड या रस्त्यावर भाजीबाजार भरतो.त्यामुळे भाजी व फळ विक्रेत्यांनी खराब झालेली भाजी व फळे फेकून दिल्यानंतर ती खाण्यासाठी येथे जनावरांचा कळपच उभा असतो.याचाही वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून त्याचा नागरिकांनाही त्रास होत आहे.

दरम्यान आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास तर धारणगाव रोड व जोशी नगर,ब्रिजलाल नगर या परिसरात एका काळ्या-पांढऱ्या गाईने कहर केला असून आपल्या दुचाकीवरून जाणाऱ्या ऋषिकेश चंद्रशेखर कुलथे (वय-२३) या विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला होता.त्याने या मोकाट गायीशी दोन हात केले असून त्यात तो चांगलाच जखमी झाला असल्याची खबर त्याचे वडिल चंद्रशेखर कुलथे यांनी दिली आहे.तर दुसऱ्या घटनेत त्याच गायीने शैला शेखर नवलपुरे (वय-५०) किशोर शिंदे,(वय-४०) श्री खालकर (यांचे नाव समजू शकले नाही) या चौघांना जखमी केले आहे.हि गाय पिसाळलेली असल्याचा आरोप माजी गटनेते विरेन बोरावके यांनी केला आहे.व या मोकाट प्राण्यांचा नगरपरिषदेने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.नगरपरिषदेच्या एका पथकाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केले असला तरी तो अयशस्वी झाला आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close