कोपरगाव तालुका
मुस्लीम समाजाच्या कब्रस्तानचे प्रलंबित प्रश्न सोडविले-…यांची माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सर्व समाजाला समान न्याय देतांना समाजमंदिरासाठी कोट्यावधी निधी दिला असून मतदार संघातील मुस्लीम समाजाच्या कब्रस्तानच्या दुरुस्तीसाठी व सुशोभीकरणासाठी देखील कोट्यावधी रुपयांचा निधी दिल्यामुळे प्रलंबित असलेले कब्रस्तानचे प्रश्न सोडविले असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील स्मशानभूमीचे अनेक वर्षापासूनचे मंजूर,करंजी,कोळगाव थडी,चितळीचे जागेचे प्रश्न सोडविले आहे.चांदेकसारे,सुरेगाव,धामोरी,धारणगाव,कुंभारी कब्रस्तानच्या जागेचा प्रस्ताव प्रगतीपथावर आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव विधानसभा.
वैशिष्ट्यपुर्ण कामांसाठी विशेष अनुदान ठोक तरतूद योजने अंतर्गत कोपरगाव शहरातील प्रभाग क्र. १३ मध्ये १५ लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या नगरपरिषद हद्दीतील मौलवी गंज गजानननगर (कोर्ट रोड) भागातील कब्रस्तान दुरुस्ती व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी मौलाना आसिफभाई,मौलाना मुक्तारभाई,मौलाना रियाजभाई,मौलाना यासीनभाई सय्यद,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरनारे,संचालक दिनार कुदळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,रमेश गवळी,फकिर कुरेशी,दिनकर खरे,मेहमूद सय्यद,राजेंद्र वाकचौरे,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,विद्यार्थी तालुकाध्यक्ष निखील डांगे, अशोक आव्हाटे, डॉ.जाकीर शेख,अल्ताफ शहा,मुख्याध्यापक मोबिना शेख,फरहद सिद्दीकी आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”काळे परिवाराने नेहमीच सर्वधर्मसमभाव जपतांना सर्वच समाजाला मदत करून मुस्लीम समाजाच्या कब्रस्तानसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे.हि परंपरा पुढे अबाधित ठेवून मागील साडेतीन वर्षात मतदार संघाच्या कब्रस्तानसाठी १ कोटी ८५ लाखाचा निधी दिला आहे.तसेच स्मशानभूमीचे अनेक वर्षापासूनचे मंजूर,करंजी,कोळगाव थडी,चितळीचे जागेचे प्रश्न सोडविले आहे.चांदेकसारे,सुरेगाव,धामोरी, धारणगाव,कुंभारी कब्रस्तानच्या जागेचा प्रस्ताव प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले व यापुढील काळात देखील अधिकाअधिक निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शेवटी आ.काळे यांनी सांगितले आहे.