जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

…या शहरात गोवंश हत्या सुरूच,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरात हिंदू संघटनांसह विविध संघटनांचा गोवंश हत्येला मोठा विरोध होऊनही अद्यापही बैल बाजार रोड लगत असलेल्या आयेशा कॉलनी येथे गोवंश हत्या सुरूच असल्याची बाब पुन्हा एकदा काल पहाटे उघड झाली असून पोलिसांनी याबाबत कसली फाटा या ठिकाणी गोवंश वाहतूक करणारे एक वाहन जप्त केले असून यातील आरोपी अझहर जाविद कुरेशी (वय -१८) याचे विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.

    

कोपरगाव ते शिरसगाव या रस्त्याने कासली फाटा या ठिकाणी अवैध टाटा टेम्पो मधून गोवंश वहातुक करताना एक छापा मारण्यात आला आहे.त्यात आयेशा कॉलनी येथील आरोपी अझहर कुरेशी याने आपल्या ताब्यातील वरील कंपनीचा ए.सी.ई.-१० टेम्पो छोटा हत्तीत (क्रं.एम.एच.१५ सी.के.६९५०) यात तीन गोवंश जातीची जनावरे आढळून आली आहे.

   सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दीत संजयनगर परिसरात वारंवार अवैध कत्तलखाणे सुरु असल्याचे सिद्ध होत असून त्या ठिकाणी राजरोस गोवंश कत्तल होत असल्याचे दिसून येत आहे.सात वर्षांपूर्वी ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गोवंश कत्तल झाल्याचे निष्पन्न झाले होते.ते रक्त मिश्रित पाणी पवित्र गोदावरी नदीत जात असून त्याच पाण्याने हिंदू देवदेवतांचा अभिषेक होत आहे.या व अशा अनेक अत्यंत निंदनीय घटना वारंवार उघड झाल्या आहेत.या बाबत शहरातील हिंदू संघटनांनी दोन तीन वर्षापूर्वी कोपरगाव नगरपरिषदेवर व शहरातील तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला होता.गेल्या आठ दहा महिन्यापूर्वीच आयेशा कॉलनी,संजयनगर भागात अवैध कत्तली सुरू असल्याच्या कारणाने हिंदुत्ववादी संघटनांनी सदर गोवंश जनावरांच्या कत्तली थांबवावी यासाठी आंदोलन छेडले होते.सदर अवैध अतिक्रमणे व गौवंश हत्या थांबवावी असा इशारा दिल्यामुळे कोपरगाव नगरपालिकेने पोलीस बंदोबस्तामध्ये अवैध अतिक्रमणे काढून कत्तलखाणे बंद केले होते.परंतु आजही हे कत्तलखाने अगदी जोमाने व राजरोसपणे सुरू आसल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना मिळाली गोपनीय माहिती नुसार आज सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास कोपरगाव ते शिरसगाव या रस्त्याने कासली फाटा या ठिकाणी अवैध टाटा टेम्पो मधून गोवंश वहातुक करताना एक छापा मारण्यात आला आहे.त्यात आयेशा कॉलनी येथील आरोपी अझहर कुरेशी याने आपल्या ताब्यातील वरील कंपनीचा ए.सी.ई.-१० टेम्पो छोटा हत्तीत (क्रं.एम.एच.१५ सी.के.६९५०) यात तीन गोवंश जातीची जनावरे आढळून आली आहे.



   दरम्यान त्यात एक ०७ हजार रुपये किमतीची जर्शी गाय,०५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची पाठीवर पांढरे पट्टे असलेले जर्शी गाय,०८ हजार रुपये किमतीची तांबड्या रंगाची बारीक शिंगे असलेली जार्शी गाय,एक ०२ लाख रुपये किमतीचा वरील वर्णनाचा टाटा टेंपो असा एकूण ०२ लाख २० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.या घटनास्थळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचेसह पो.हे.कॉ.एन.एस.शेख यांनी भेट दिली आहे,

    या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुध्द पो.कॉ.प्रकाश सुरेश नवाळी यांनी गुन्हा नोंद क्र.१६४/२०२५ महाराष्ट्र पशु संरक्षण ५,९,प्राण्यांचा छळ ११(१),(ड)मोटार वाहन कायदा कलम १३०,१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.एन.एस.शेख हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close