जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया हिओळख पुन्हा निर्माण करणार-आश्वासन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया अशी कोपरगाव मतदार संघाची ओळख होती.मात्र मागील काही वर्षापासून ही ओळख पुसली गेली आहे.राजकीय पदार्पण केल्यापासून मतदार संघाची ही ओळख पुन्हा मिळवायची असा मनाशी निश्चय केला असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

“कोपरगाव तालुक्यातील गावांप्रमाणेच मतदार संघाला जोडलेल्या राहाता तालुक्यातील अकरा गावांचा विकास करणे हे आपण आपले कर्तव्य समजतो.त्यामुळे या अकरा गावातील रस्ते,वीज,पाणी हे प्रश्न सोडविण्या बरोबरच मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे ही माझी जबाबदारी आहे”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष,श्री साईबाबा संस्थान शिर्डी.

पुणतांबा येथील ईदगाह मैदानावर १० लक्ष रुपये निधीतून बसविण्यात येणाऱ्या पेव्हिंग ब्लॉक कामाचे भूमिपूजन व वाकडी येथे १० लक्ष रुपये निधीतून मुस्लिम कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे भूमीपूजन नुकतेच आ.काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड,गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते,मुरलीधर थोरात,अनिल कोते,अण्णासाहेब कोते,महेश जाधव,भाऊसाहेब लहारे,अशोक शेळके,मुरलीधर शेळके,सुरेश लहारे,शंकर लहारे,निलेश कोते,निलेश लहारे,जालिंदर कोते,प्रभाकर एलम,मौलाना फारूक काजी,मौलाना अकील,उपसरपंच महेश चव्हाण,शांतीलाल भाटी,शैलेश कुलकर्णी,बाळासाहेब चव्हाण,अशोक धनवटे,संजय धनवटे,सुनील थोरात,शाम धनवटे,शौकत शेख,अस्लम शेख,अजीम तांबोळी,युनूस तांबोळी,सार्वजनिक बांधकाम अभियंता सुमित घोरपडे,तलाठी विश्वनाथ बोधमवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते

पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोपरगाव तालुक्यातील गावांप्रमाणेच मतदार संघाला जोडलेल्या राहाता तालुक्यातील अकरा गावांचा विकास करणे हे आपण आपले कर्तव्य समजतो.त्यामुळे या अकरा गावातील रस्ते,वीज,पाणी हे प्रश्न सोडविण्या बरोबरच मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे ही माझी जबाबदारी आहे.त्या जबाबदारीशी बांधील राहून निधी दिला आहे तसेच इतर समाजासाठी देखील निधी देवून सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका असल्याचे ना.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.यावेळी आ.काळे यांनी ८० लक्ष रुपये निधीतून करण्यात येत असलेल्या गणेशनगर-वाकडी रस्त्यावरील पुलाच्या कामाची पाहणी केली.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close