कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील…या दोन पाणी योजनांसाठी ६६ कोटी मंजूर

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख,वेस-सोयगाव,धोंडेवाडी,बहादरपूर,अंजनापूर,मनेगाव व राहाता तालुक्यातील वाकडी या आठ गावांचा पाणी प्रश्न कायमचा सुटावा यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून या आठ गावांच्या पाणी पुरवठा योजनांना शासनाकडून जवळपास ६६ कोटी निधी मंजूर करण्यात आला असून या ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
रांजणगाव देशमुख सह सहागावांची प्रादेशिक पाणी योजना सन-१९९५ पासून म्हणजे युती शासनाच्या कालखंडापासून प्रलंबित आहे.अद्यापही या सहा गावांना पिण्याचे पाणी पूरेशा प्रमाणात मिळत नाही हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही.त्याची गंभीर दखल घेवून आ.काळे यांनी प्राधान्य दिल्याचे दिसू लागले आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावाचे अद्यापही पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे.निवडणुका येतात आणि जातात दर निवडणुकांत मतदारांना आश्वासने मिळतात मात्र निवडणुका संपल्या की प्रश्न जैसे थे राहात असल्याचे वारंवार दिसून आले आहे.रांजणगाव देशमुख सह सहागावांची प्रादेशिक पाणी योजना सन-१९९५ पासून म्हणजे युती शासनाच्या कालखंडापासून प्रलंबित आहे.अद्यापही या सहा गावांना पिण्याचे पाणी पूरेशा प्रमाणात मिळत नाही हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही.त्याची गंभीर दखल घेवून आ.काळे यांनी प्राधान्य दिल्याचे दिसू लागले आहे. तया पाठपुराव्यातून नुकताच मतदार संघातील आठ गावांना ६५.९७ कोटी निधी जल जीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनांसाठी मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान यात रांजणगाव देशमुखसह वेस-सोयगाव,धोंडेवाडी,बहादरपूर,अंजनापूर,मनेगाव या सात गावांच्या पाणी योजनेसाठी ३५ कोटी ९८ लाख ५५ हजार व राहाता तालुक्यातील वाकडी गावच्या पाणी पुरवठा योजनेसाठी २९ कोटी ९८ लाख ९० हजार असा एकूण ६५ कोटी ९७ लाख ४५ हजार निधी या पाणी पुरवठा योजनांसाठी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांची मागील अनेक वर्षापासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लागणार आहे. दरम्यान या मंजुरीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.