जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात अपघात एक ठार,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील शिर्डी लासलगाव रस्त्यावर नुकत्याच झालेल्या अपघातात एका सिंमेट टँकरने दिलेल्या धडकेत पानमळा,चांदेकसारे येथील तरुण प्रसाद रामदास तुवर (वय-२०) गंभीर रित्या जखमी झाला असून या अपघातात तो गंभीर रित्या जखमी होऊन शिर्डी येथील उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी हॉटेल व्यावसायिक असलेले तरुण विजय केशवराव होन (वय-३३) यांचे हॉटेल साई मुकुंदा असून त्याच्या समोर दि.१८ ऑगष्ट रोजी सकाळी ७.५० वाजेच्या सुमारास आरोपीने आपल्या ताब्यातील महिंद्रा बल्कर (क्रं.के.ए.२८ डी.११५८) भरधाव वेगाने चालवून सदर रस्त्याने चुकीच्या बाजूने चालवत रस्त्याने चालत असणारे इसम प्रसाद रामदास तुवर (वय-२०) रा.पानमळा चांदेकसारे यास जोराची धडक देऊन गंभीर जखमी केले होते.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी हॉटेल व्यावसायिक असलेले तरुण विजय केशवराव होन (वय-३३) यांचे हॉटेल साई मुकुंदा असून त्याच्या समोर दि.१८ ऑगष्ट रोजी सकाळी ७.५० वाजेच्या सुमारास आरोपीने आपल्या ताब्यातील महिंद्रा बल्कर (क्रं.के.ए.२८ डी.११५८) भरधाव वेगाने चालवून सदर रस्त्याने चुकीच्या बाजूने चालवत रस्त्याने चालत असणारे इसम प्रसाद रामदास तुवर (वय-२०) रा.पानमळा चांदेकसारे यास जोराची धडक देऊन गंभीर जखमी केले होते.

दरम्यान जखमीस नजीकच्या नागरिकांनी शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात भरती केले असता तेथे उपचार सुरु असताना त्याचे निधन झाले आहे.या प्रकरणी शिर्डी येथील रुग्णालयात उपचार सूरु असताना जबाब नोंदवला होता.त्या प्रकरणी शिर्डी येथील पोलिसांनी जा.क्रं.२७११/२०२२ कोपरगाव येथील तालुका पोलीस ठाण्यात पाठवून कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.३३०/२०२२ भा.द.वि.कलम ३०४ (अ) ३३८,२७९,मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एम.ए.कुसारे हे करित आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close