जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील…या महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी आ.अशोक काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सालाबादप्रमाणे याहीवर्षी सुशिलामाई काळे महाविद्यालयात संजीवनी ब्लड बँक यांच्या सहकार्याने संस्थेच्या सचिव चैताली काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

अपघातात झालेला अतिरिक्त रक्तस्राव,पॅलेसोमिया,रक्तक्षय,रक्ताचा कर्करोग,प्रसूतिपश्चात रक्तस्राव,शस्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांमधे योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते.अशावेळी एका मानवाचेच रक्त दुसऱ्या मानवाचे प्राण वाचवू शकते.कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही त्यामुळे रक्तदानाला अनन्य साधारण महत्व आहे.

दरम्यान दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येऊ शकत नाही,त्यामुळे रक्तदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.या उद्देशाने कोपरगाव तालुक्यात रक्तडान्स शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सदर रक्तदान शिबिराचे उदघाटन कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य ज्ञानदेव मांजरे व दिलीपराव चांदगुडे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे देखील उदघाटन करण्यात आले आहे.

सदर प्रसंगी प्रास्तविक करतांना प्राचार्या डॉ.विजया गुरसळ म्हणाल्या की, महाविद्यालयाच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.मागील दोन वर्ष कोरोना साथीचे संकट होते.महाविद्यालयाचे बहुतांश कामकाज ऑनलाईन सुरु असतांना देखील सामाजिक उपक्रम सुरु होते. मात्र मागील काही महिन्यांपासून कोरोना संकटाची तीव्रता बऱ्याचअंशी कमी झाल्यामुळे साहजिकच सर्व निर्बंध शिथिल होवून महाविद्यालयाचे कामकाज देखील नियमितपणे सुरु झाले आहे. मानवी रक्ताची असलेली कमतरता लक्षात घेवून माजी आ.काळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी या रक्तदान शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी संजीवनी ब्लड बँकेच्या संचालिका डॉ.नीता पाटील,सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच संस्थेच्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये देखील नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी प्राचार्य नूर शेख,शिक्षक,हाऊस मास्टर्स,स्काऊट व एन.सी.सी.युनिट आणि विद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close