जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात चोरट्यांचा हैदोस,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर आणि तालुक्यात चोरट्यांचा बंदोबस्त होण्याचे नाव घेत नाही वडांगळे वस्ती येथील चोरीचा गुन्हा दाखल झाल्याची शाई वाळते न वाळते तोच कोपरगाव येथील साखरे स्टील यांची ५० हजारांची चोरी झाली असून त्याच रस्त्यालगत योगीराज फर्निचर,संस्कृती साडी डेपो आदिसंह सात दुकाने फोडली असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.याधीही पूनम चित्रपट गृहासमोर व व्यापारी धर्मशाळेसमोर तीन दुकाने फुटली असून एक दुचाकी चोरीस गेली असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचा तींन वर्षाचा कालावधी संपला असल्याची माहिती असून या ठिकाणाहुन त्याची कधीही बदली होऊ शकते त्यामुळे या पोलीस ठाण्यास नवीन अधिकारी येणे गरजेचे आहे याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी पुढाकार घेऊन नूतन अधिकारी आणणे गरजेचे बनले असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.ते याबाबत कोणती भूमिका घेणार याकडे नागरिकाचे लक्ष लागून आहे.

कोपरगाव तालुक्यात चोरट्यांचा आणि बेकायदा व्यवसायाचा सुळसुळात झाला आहे.दुचाकी,चारचाकी चोऱ्यासह अन्य भुरट्या चोऱ्या नित्याच्या झाल्या आहेत.त्यामुळे शहरातील नागरिक आणि तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांना शांतचित्त झोप अशक्य झाली आहे.या संबंधी राष्ट्रवादीचे आ.काळे यांनी काही दिवसापूर्वी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते.मात्र परिणाम शून्य असल्याचे दिसत आहे.अद्याप तरी त्याचे सकारात्मक परिणाम समोर आलेले नाही.मात्र कोपरगाव शहराच्या ईशान्येस असलेल्या साधारण तीन कि.मी.अंतरावर असलेल्या वडांगळे वस्तीवरील एका घटनेची नुकतीच भर पडली असताना आज पुन्हा अनेक चोऱ्या उघड झाल्या आहेत.त्यात ‘साखरे स्टील’या प्रदीप साखरे यांच्या फार्मची भर पडली आहे.त्यांनी याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान त्याच येवला रोड लगत आणखी काही चोऱ्या झाल्या असल्याची बातमी असून यात चंद्रकांत कौले यांचे योगीराज फर्निचर,संस्कृती साडी डेपो आदींसह सात दुकाने फोडली असल्याची बातमी आहे.

दरम्यान आणखी एका माहितीनुसार दोन दिवसापूर्वी व्यापारी धर्म शाळेसमोर असलेले जोशी किराणा स्टोअर यांचे दुकान फोडून आतील ५-६ हजारांचा अवैज गेला असून,अजित शिंगी यांची तेल एजन्सीचे कुलूप तोडले आहे मात्र आत काही नसल्याने नुकसान टळले आहे.तर योगेश ठोळे यांचे किराणा दुकाणाचे कुलूप तोडल्याच्या प्रयत्न झाला असल्याची माहिती त्यानी दिली आहे.त्यामुळे चोरट्यांच्या या चौर्य लीलांचा नागरिकांना सामना करावा लागला आहे.तर या शिवाय आनंद गंगवाल यांची होंडा पॅशन (क्रं.एम.एच.१७ ए.टी.५२३७) हि सुमारे ३५ हजारांची दुचाकी चोरीस गेली आहे.त्यामुळे या प्रकरणी नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी आमच्या प्रतिनिधीने पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी साखरे स्टील प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याच्या घटनेस दुजोरा दिला आहे.व अन्य दुकाने फुटली असली तरी त्यात जास्त नुकसान झाले नाही असे सांगितले आहे.तर वर्तमानात बंद असलेल्या ‘पूनम’ चित्रपट गृहासमोर असलेल्या दुकानांच्या चोरीस दुजोरा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close