आरोग्य
..या नेत्याच्या वतीने शासकीय कार्यालयात स्वच्छता अभियान
संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव-(प्रतिनिधी) जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना व्हायरसने देशात मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला असून यामध्ये महाराष्ट्र राज्य केंद्रस्थानी असून सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहे.अहमदनगर जिल्ह्यात देखील कोरोना व्हायरस बाधित दोन रुग्ण असून या कोरोना व्हायरसला पोषक वातावरण निर्माण होऊ नये यासाठी आ.आशुतोष काळे यांच्यावतीने सर्व शासकीय कार्यालयात स्वच्छता अभियान राबवून औषध फवारणी करण्यास प्रारंभ केला आहे.
कोरोना विषाणूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून देशातील कोरोनोच्या रुग्ण संख्येत होणारी वाढ तसेच राज्यातील रुग्णांच्या संख्येत दररोज होणारी वाढ चिंताजनक आहे.नागरिकांच्या आरोग्याची आरोग्य विभाग, तहसील कार्यालय,पोलीस प्रशासन, कोपरगाव नगरपरिषद व पंचायत समितीच्या वतीने काळजी घेतली जात आहे. सर्व नागरिक कोरोना विषाणूच्या भीतीपोटी आपापल्या घर बंद झाले आहेत
कोरोना विषाणूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून देशातील कोरोनोच्या रुग्ण संख्येत होणारी वाढ तसेच राज्यातील रुग्णांच्या संख्येत दररोज होणारी वाढ चिंताजनक आहे.नागरिकांच्या आरोग्याची आरोग्य विभाग, तहसील कार्यालय,पोलीस प्रशासन, कोपरगाव नगरपरिषद व पंचायत समितीच्या वतीने काळजी घेतली जात आहे. सर्व नागरिक कोरोना विषाणूच्या भीतीपोटी आपापल्या घर बंद झाले आहेत मात्र सर्व शासकीय विभागाचे कर्मचारी मात्र आपला जीव धोक्यात घालून नागरिकांना कोरोनापासून दूर ठेण्यासाठी प्रयत्न करीत आहे.या कर्मचाऱ्यांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी स्वच्छता अतिशय महत्त्वाची असून आ.आशुतोष काळे यांनी सर्व शासकीय कार्यालय स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला असून सोमवार (दि.२३) पासून सर्व शासकीय कार्यालयात जमिनतळ स्वच्छता करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नायब तहसीलदार योगेश कोतवाल, नगरसेवक मंदार पहाडे, हिरामण गंगूले, अजीज शेख, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, अॅड.राहुल रोहमारे, फकीर कुरेशी, मंडलाधिकारी के.सी. दुशिंग, अव्वल कारकून श्री भांगरे, तलाठी एस.एम.साबणे,श्री साखरे, संकेत पवार आदी उपस्थित होते. सोमवार दिनांक २३ मार्चपासून संपूर्ण राज्यात कलम १४४ लागू करण्यात आले असले तरी हॉस्पिटल,मेडिकल,किराणा दुकान,दूध विक्री,पेट्रोलपंप आदी अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार असल्यामुळे नागरिकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे.त्यामुळे अशा गर्दीच्या ठिकाणी औषध फवारणी केल्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्यास प्रतिबंध घालता येणार असल्यामुळे अशा ठिकाणी जंतुनाशक फवारणी प्रारंभ करण्यात आली आहे.जिल्ह्यात जरी कोरोना व्हायरस चे रुग्ण असले तरी कोपरगाव विधानसभा मतदार संघात एकही कोरोना विषाणूबाधित रुग्ण नाही ही समाधानकारक गोष्ट आहे. मात्र प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे हे देखील महत्वाचे आहे. सर्वत्र जमावबंदी आदेश लागू आहे मात्र जनता कर्फ्युला प्रतिसाद देणारे नागरिक आपल्या जीवाची पर्वा न करता मोठ्या प्रमाणात बाहेर फिरतांना दिसत आहे. हे निश्चितपणे चुकीचे आहे.परिस्थिती केव्हाही हाताबाहेर जाऊ शकते त्यासाठी नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.