जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

समृद्धी महामार्गाच्या ठेकेदारांना २१.०९ कोटींच्या दंडाच्या नोटिसा

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातून समृद्धी महामार्गाच्या ठेकेदारांनी मंजूर क्षमतेपेक्षा जास्त गौण खनिजांची वाहतूक करून शासनाची फसवणूक केली असल्याचे उघड झाल्याने कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी पोहेगावंचे मंडलाधिकारी यांच्या चांदेकसारे अहवालानुसार गायत्री प्रोजेक्ट ली. व दिलीप बिल्डकॉन कंपनी आदी दोन कंपन्यांना २१ कोटी ०९ लाख १० हजार रुपयांच्या दंडा बाबत कारणे दाखवा नोटिसा बजावल्याने खळबळ उडाली आहे.

यात महसूल विभागाने दंडाच्या आकारणीसाठी मुरुमाचा दर एक हजार रुपये प्रतिब्रास धरला असून रॉयल्टी प्रतिब्रास हि ४०० रुपये प्रतिब्रास धरल्याने उघड झाले आहे.त्यामुळे या कंपन्यांत खळबळ उडाली आहे.या बाबत कोपरगावच्या तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तीन दिवसाच्या आत या बाबत खुलासा करण्यास फर्मावले आहे.

कोपरगाव तालुक्यातून भाजपच्या महात्वांकांक्षी समजल्या जाणाऱ्या ५६ हजार कोटी रुपयांच्या समृद्धी महामार्गाचे काम वर्तमानात वेगाने सुरु आहे.या महामार्गासाठी जवळपास तेरा ते चौदा फूट उंची दिली असल्याने त्यासाठी मोठ्या प्रमाणावर गौण खनिजांची मोठी गरज आहे.त्यासाठी त्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करून तर काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या साठवण बंधाऱ्यातील तर काही ठिकाणी नद्या,नाले यातून मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उचलले आहे.त्या साठी त्यांना विशिष्ठ खोली शासनाने ठरवून दिली आहे मात्र कामाच्या धबडक्यात त्यांनी महसूल विभागाच्या नियमांचीच पायमल्ली केल्याच्या तक्रारी नुकत्याच संपन्न झालेल्या कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांच्या जनता दरबारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर केल्या होत्या. त्यात देर्डे चांदवड व चांदेकसारे या गावांचा समावेश होता.त्याची दखल आ. आशुतोष काळे यांनी घेऊन या बाबत गांभीर्याने तक्रारींचा निवाडा करण्याचे आदेश दिले होते.त्या प्रमाणे कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी पोहेगाव येथील मंडलाधिकारी यांना अहवाल देण्याचे फर्मान काढले होते.त्या नुसार कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील मंडलाधिकारी यांनी आपला अहवाल नुकताच सादर केला होता.त्यात हि गंभीर बाब उघड झाली असून त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

यात गायत्री प्रोजेक्ट ली.या आंध्रप्रदेशातील कंपनीस देर्डे-चांदवड येथील ग.नं.१८९ मध्ये १५ हजार ५६० ब्रास अधिकचे गौण खनिज उचलल्या प्रकरणी २ कोटी ३१ लाख ८४ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून दुसऱ्या ग.न.२१८(२) व १७७ मध्ये अनधिकृतपणे ३३ हजार ७०६ ब्रास गौण खनिज उचलल्या प्रकरणी ४ कोटी ७१ लाख ८८ हजार ४०० रुपयांचा दंडाचा प्रस्ताव आहे.या खेरीज डाऊच बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत ग.नं.१३८ मध्ये ६२४ ब्रास मुरूम अनधिकृतपणे उचलल्याचा ठपका मंडलाधिकाऱ्यांनी ठेवला असून त्याच्या दंडाची रक्कम ८ लाख ७३ हजार ६०० रुपये इतकी आहे.तर त्याच गावात ग.नं.१३९ मध्ये २० हजार १६० ब्रास मुरूम जास्त उचलल्याचे ठपका ठेवण्यात आला असून त्याच्या दंडाची रक्कम २ कोटी ८२ लाख २४ हजार इतकी आली आहे.

या खेरीज त्याच गावातील ग.नं.१४०,१४१,१४२,१४६ या मधून गायत्री प्रोजेक्टने ६४ हजार ब्रास अवैध गौण खनिजांचा उपसा केला आहे.त्यापोटी महसूल विभागाने या कंपनीस ८ कोटी ९६ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.असा या गायत्री कंपनीस म्हसुल विभागाने १८ कोटी ९० लाख ७० हजार रुपयांचा विक्रमी दंडाच्या नोटिसा दिल्याने या कंपनीची पाचावर धारण बसणार आहे.

तर देर्डे-चांदवड ग्रामपंचायत हद्दीत दिलीप बिल्डकॉन या कंपनीने ग.नं.१९४ मधून १५ हजार ६०० ब्रास मुरूम अवैधरित्या उचलल्याचे निदर्शनास आले आहे.त्यापोटी या कंपनीस २ कोटी १८ लाख ४० हजर रुपयांचा दंड ठोठावला जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यात महसूल विभागाने दंडाच्या आकारणीसाठी मुरुमाचा दर एक हजार रुपये प्रतिब्रास धरला असून रॉयल्टी प्रतिब्रास हि ४०० रुपये प्रतिब्रास धरल्याने उघड झाले आहे.त्यामुळे या कंपन्यांत खळबळ उडाली आहे.या बाबत कोपरगावच्या तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तीन दिवसाच्या आत या बाबत खुलासा करण्यास फर्मावले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close