सामाजिक उपक्रम
लोहगाव ग्रामपंचायतीस राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
लोहगाव वार्ताहर राहाता तालुक्यातील लोहगाव ग्रामपंचायतीस दींनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तिकरण राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार लोहगाव ग्रामपंचायतीस मिळाला आहे.ग्रामपंचायतीच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,खासदार डॉ.सुजय विखे व माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शन लाभल्याने लोहगाव ग्रामपंचायत पुरस्कार मिळवू शकले.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले आहे.
तसेच गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे यांचेही मार्गदर्शन लाभले तसेच पंचायत समितीचे पदाधिकारी अधिकारी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
लोहगाव ग्रामपंचायत सरपंच स्मिताताई भाऊसाहेब चेचरे,उपसरपंच सुरेश गणपत चेचरे,सर्व सदस्य,ग्रामविकास अधिकारी श्रीमती रुक्मीणी एस. सूर्यवंशी,कर्मचारी वृंद व सर्व ग्रामस्थांचे मोठे सहकार्य असलेमुळे हा पुरस्कार मिळवू शकलो त्या बद्दल यांचे लोहगाव ग्रामस्थांच्यावतीने ग्रामपंचायत पदाधिकारी चे कौतुक होत आहे.