जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात बी.ओ.टी. तत्वावर व्यापारी संकुल- विधानसभेत मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेदरम्यान राज्यभरातील बस डेपो व बसस्थानक परिसरात उपलब्ध असलेल्या जागेवर बीओटी तत्वावर व्यापारी संकुल उभारले जावू शकतात का? असा प्रश्न उपस्थित केला असता या प्रश्नाला परिवहनमंत्री ना.अॅड.अनिल परब यांनी आ. आशुतोष काळे यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची बातमी आहे.

कोपरगाव शहरात मार्च २०११ पासून विस्थापित नागरिकांचा व दुकानदारांच्या प्रश्न प्रलंबित आहे.प्रत्येक निवडणुकीत आपल्या मतांच्या झोळ्या भरण्यासाठी राजकीय नेते तो ऐरणीवर आणतात.जनतेला फसविण्यासाठी सडा-रांगोळ्या काढल्या जातात व निवडणूक संपली कि या विस्थापित व्यापाऱ्यांना वाऱ्यावर सोडून देतात असे गत दहा वर्षात अनेक वेळा झाले आहे.या वेळी आ. काळे यांनी कोणतीही निवडणूक नसताना हा विषय छेडला असल्याने व्यापाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

मुंबई येथे सुरु राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे.त्यात आ.आशुतोष काळे यांनी बस डेपो व बसस्थानक परिसरात बेरोजगार युवक व गरजू नागरिकांना व्यवसाय करण्याच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटावा यासाठी बीओटी तत्वावर व्यापारी संकुल उभारले जावू शकतात का ? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाला परिवहनमंत्री ना.अॅड.अनिल परब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या प्रश्नाला उत्तर देतांना परिवहनमंत्री अॅड.अनिल परब म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात परिवहन खात्यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. त्या माध्यमातून अनेक ठिकाणी बस डेपो दुरुस्तीची कामे सुरु आहेत. त्या ठिकाणी बस डेपो व बसस्थानक परिसरात मोक्याच्या ठिकाणी बीओटी तत्वावर व्यापारी संकुल उभारून जर महामंडळाला व बस प्रवाशांना फायदा होत असेल तर त्याचा नक्कीच विचार केला जाणार असल्याचे सांगितले.

कोपरगाव बस आगारात व्यापारी संकुल उभारावे यासाठी आ.आशुतोष काळे यांनी परिवहनमंत्री ना.अॅड.अनिल परब यांना यापूर्वी निवेदन दिलेले आहे. कोपरगाव शहरातील बस स्थानक, श्री क्षेत्र शिर्डी पासून जवळ असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच राज्यातील प्रवाशांची ये-जा असते. या प्रवाशांना सोयीसुविधा मिळाव्या यासाठी व्यापारी संकुल होणे गरजेचे आहे. कोपरगाव शहराची वाढती लोकसंख्या, बाजारपेठेचा प्रश्न व विस्थापित टपरी धारकांचा प्रश्न व्यापारी संकुल उभारल्यानंतर सुटणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close