जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…त्या कामासाठी दिल्लीपर्यंत जाऊन प्रयत्न केले-गायकवाड यांचा दावा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या साठवण तलाव क्रमांक ५ साठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत १३१.२४ कोटी रुपये खर्चाला आर्थिक मान्यता राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने दिली असून याबाबत कोपरगावचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिलेला शब्द पाळला असून त्यासाठी दिल्ली पर्यंत केंद्रीय रस्ते वहातुक मंत्री नितीन गडकरी यांच्या पर्यंत पाठपुरावा केला असल्याचा दावा निष्ठावान भाजपचे माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड यांनी केला आहे.

“पाच क्रमांकाचा साठवण तलाव व्हावा यासाठी सर्वप्रथम वहाडणे,संजय काळे,नितीन शिंदे यांचेसह २०१८ मध्ये शिर्डी येथे समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या,”गायत्री कंपनी”चे श्री.रेड्डी यांच्यासमवेत बैठक घेतली होती.त्यानंतर दिल्ली येथे जाऊन केंद्रीय भाजपचे उपाध्यक्ष असलेले श्याम जाजू यांचेसह नोव्हेंबर २०१८ मध्ये केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांची भेट घेऊन कोपरगाव शहराची पाणी टंचाई कमी व्हावी यासाठी समृद्धीच्या माध्यमातून पाच नंबर साठवण तलावाचे खोदकाम करण्याची आवश्यकता पटवून दिली होती व पुढे काम सुरु झाले होते”-विनायक गायकवाड,माजी अध्यक्ष,कोपरगाव शहर भाजप.

सन-२०१६ च्या कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत कोपरगाव शहराची तहान कायमची भागविण्यासाठी पाच नं साठवण तलावाची गरज असून साठवण क्षमता वाढल्यानंतर निश्चितपणे पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन त्यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजय वहाडणे यांच्या लक्षात आल्यामुळे ५ क्रमांकाच्या साठवण तलाव व्हावा पाणी चोरी थांबावी व वितरण व्यवस्था दुरुस्त करावी यासाठी ते आग्रही होते.त्यामुळे त्यांनी निवडणुक प्रचाराच्या वेळी ५ क्रंमांकाच्या साठवण तलावाच्या माध्यमातून पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते.त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांनी नगरपरिषद निवडणूक संपल्यावर प्रयत्न सुरु केले होते.व केंद्र सरकार व राज्यसरकार मध्ये असलेल्या आपल्या भाजपच्या ओळखीच्या नेत्यांचा वापर करून या कामासाठी सातत्याने प्रयत्न केला होता.परिणामस्वरूप आज ५ क्रमांकाच्या साठवण तलावाच्या कामासाठी १३१.२४ कोटी निधीला प्रशासकीय मान्यता मिळविली असल्याचा गायकवाड यांनी दावा केला आहे. कोपरगाव शहरातील जनतेच्या दृष्टीने हि अतिशय महत्वपूर्ण घटना आहे.

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,”कोपरगाव शहरासाठी अतिशय महत्वाचा असलेला पाच क्रमांकाचा साठवण तलाव व्हावा यासाठी सर्वप्रथम वहाडणे,माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे,नितीन शिंदे यांचेसह २०१८ मध्ये शिर्डी येथे समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या,”गायत्री कंपनी”चे श्री.रेड्डी यांच्यासमवेत बैठक घेतली होती.त्यानंतर नगराध्यक्ष वहाडणे यांनी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय भाजपचे उपाध्यक्ष असलेले श्याम जाजू यांचेसह नोव्हेंबर २०१८ मध्ये केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांची भेट घेऊन कोपरगाव शहराची पाणी टंचाई कमी व्हावी यासाठी समृद्धीच्या माध्यमातून पाच नंबर साठवण तलावाचे खोदकाम करण्याची आवश्यकता पटवून दिली होती.त्यावेळी ना.नितीन गडकरी यांनी त्वरित हैदराबाद येथे फोनवर श्री.रेड्डी यांचेशी संपर्क करून पाच नं. साठवण तलावाचे खोदकाम करण्याचे निर्देश दिले.त्यानंतर नगराध्यक्ष वहाडणे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,अभियंता डिगंबर वाघ,अभियंता श्रीमती पाटील आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या गायत्री कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत अनेक बैठका झाल्या होत्या.अनेकदा प्रांताधिकारी गोविंद शिंदे हेही उपस्थित होते.जमिनीतून माती-मुरूम-दगडाचे नमुने घेण्यात येऊन “गायत्री कंपनी” ने खोदकाम करून माती-मुरूम वाहून न्यायला सुरुवातही केली.त्याकाळात किमान पन्नास वेळा अधिकारी-कार्यकर्त्यांसह खोदकाम करून घेण्यासाठी तळ्याजवळ थांबलो.त्यानंतर वहाडणे व संजय काळे यांनी नाशिक येथे जाऊन उत्खननासाठी “ब्लास्टिंग” करण्याची लेखी परवानगी जलसंपदा विभाग यांचेकडून आणली होती.पण कोपरगावच्या दुर्दैवाने राजकिय अडथळे आणले गेल्याने काम मधेच थंडावले-बंद पडले होते.
मात्र त्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये आशुतोष काळे आमदार झाले व त्यांनी राज्य शासनातील संबंधांचा वापर करून पाच क्रमांकाच्या साठवण तलावाच्या कामाला गती दिली.सातत्याने नगराध्यक्ष वहाडणे,अनुभवी मुख्याधिकारी शांताराम गोसावी,यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व संबंधित सर्व शासकिय विभाग-अधिकारी,प्रकल्प सल्लागार श्री.सनेर (धुळे) यांना सोबत घेऊन पाच नंबर साठवण तलाव कामाला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिले होते.आता तर राज्य शासनाने १३१.२४ कोटी रूपयांचा निधीला प्रशासकीय मान्यता दिल्याने,पाच क्रमांकाच्या साठवण तलाव व जलवितरण योजना पूर्ण होणार याची खात्री पटलेली आहे.तसा अधिकृत निर्णयच शासनाने घेतला आहे.या लढ्याला कोपरगावातील काही निःस्वार्थ सामाजिक कार्यकर्त्यांनीही आपापल्या परीने यासाठी हातभार लावला असल्याचे त्यांनी मोठ्या मनाने मान्य केले आहे.नगराध्यक्ष,मुख्याधिकारी व आमदार यांच्यात समन्वय असेल तर विकासकामे वेगाने होतात याचा अनुभव या निमित्ताने आला असल्याचा दावाही भाजपचे निष्ठावान माजी शहराध्यक्ष गायकवाड यांनी शेवटी केला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close