जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावकरांना दिलेला…तो शब्द पाळला-दावा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या साठवण तलाव क्रमांक ५ साठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत १३१.२४ कोटी रुपये खर्चाला आर्थिक मान्यता राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने दिली असून याबाबत कोपरगावचे आं.आशुतोष काळे यांनी दिलेला शब्द पाळला असल्याचा दावा कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष विद्यासागर शिंदे यांनी केला आहे.

“विधानसभा निवडणुक प्रचाराच्या वेळी ५ क्रंमांक साठवण तलावाच्या माध्यमातून पाणी प्रश्न सोडविण्याचा शब्द दिला होता.दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करून राज्यसरकार मध्ये असलेले आपले वजन वापरून ५ क्रमांकाचा साठवण तलावाच्या कामासाठी १३१.२४ कोटी निधीला प्रशासकीय मान्यता मिळविली आहे”-अड्.विद्यासागर शिंदे,अध्यक्ष,कोपरगाव वकील संघ.

सन-२०१९ च्या विधानसभा निवडणुकी पूर्वी कोपरगाव शहराची तहान कायमची भागविण्यासाठी पाच क्रमांकाच्या साठवण तलावाची गरज असून साठवण क्षमता वाढल्यानंतर निश्चितपणे पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे ना.आशुतोष काळे यांच्या लक्षात आल्यामुळे ५ क्रमांकाच्या साठवण तलाव व्हावा यासाठी ते आग्रही होते.त्यामुळे त्यांनी निवडणुक प्रचाराच्या वेळी ५ क्रंमांक साठवण तलावाच्या माध्यमातून पाणी प्रश्न सोडविण्याचा शब्द दिला होता.दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करून राज्यसरकार मध्ये असलेले आपले वजन वापरून ५ क्रमांकाचा साठवण तलावाच्या कामासाठी १३१.२४ कोटी निधीला प्रशासकीय मान्यता मिळविली आहे.कोपरगाव शहरातील जनतेच्या दृष्टीने हि अतिशय दिलासा देणारी बाब आहे. कोपरगावचा पाणी प्रश्न मार्गी लावणे सोपे काम नव्हते त्यामध्ये अनेक अडथळे होते मात्र हि अडथळ्यांची शर्यत जिंकण्यात ना.काळे यशस्वी झाले असून त्यांनी जागृत राहून आपला शब्द पूर्ण केला असल्याचा दावाही अॅड.शिंदे यांनी शेवटी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close