कोपरगाव तालुका
न्यायालय इमारत बांधकामाची आ. काळेंनी केली पाहणी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव प्रथम वर्ग इमारत जीर्ण झाली असून त्या ठिकाणी ४७ कोटी रुपयांची नूतन इमारत मंजूर करण्यासाठी विधी व न्याय विभागाकडे पाठपुरावा सुरु आहे. झाली असून नवीन बांधकामासाठी वर्तमान इमारतीतून दप्तर हलविण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर तात्पुरती सोय करण्याचे काम वेगाने सुरु आहे.या इमारतीसाठी ६५ लाख रुपयांचा निधी खर्च होणार आहे.या कामाची पाहणी नुकतीच कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी वकील संघाच्या पदाधिकाऱ्यां समवेत पाहणी केली असून समाधान व्यक्त केले आहे.
कोपरगाव न्यायालयाची इमारत इंग्रज कालखंडात उभारण्यात आली होती त्याला जवळपास शंभर वर्षाहून अधिकचा कालखंड उलटला होता.त्यामुळे सदर इमारत वर्तमानात अपुरी पडत होती.त्यामुळे वकील संघाने या ठिकाणी नवीन इमारत बांधून मिळावी अशी गेल्या अनेक वर्षांपासून सुरु ठेवली होती.त्याला अंतीम रूप आले असून विधी व न्याय विभाग लवकरच हा ४७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता प्रशांत वाकचौरे यांनी दिली आहे.
दरम्यान या वेळी कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष शिरिषकुमार लोहकणे यांनी आ. आशुतोष काळे यांचेकडे कोपरगाव येथील सहकार न्यायालयाला स्वतंत्र इमारत बांधून मिळावी व त्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या लगत दक्षिण बाजूची जागा जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळवून द्यावी अशी महत्वपूर्ण मागणी केली आहे.त्याला आ. काळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
सदर प्रसंगी वकील संघाचे सदस्य आर.एस.जपे,शंतनू धोर्डे, बाळासाहेब कडू, विद्यासागर शिंदे, ए. ए.टेके.एस.डी. रक्ताटे, एस.जी.जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.