जाहिरात-9423439946
क्रीडा विभाग

कोपरगावात क्रिकेटच्या मैदानावर,निळवंडेचे षटकार !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात आज सकाळी ११ वाजता कोपरगाव क्रिकेट असोसिएशन,मुंबादेवी तरुण मंडळ व शिवसेना छत्रपती चौक आदींच्या संयुक्त विद्यमाने आयोजित,’सर सेनापती चषक’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे शुभारंभ करताना प्रमुख वक्त्यांचे भाषण सुरु असताना भाजपचे कोल्हे समर्थक शहराध्यक्ष दत्तात्रय काले यांनी निळवंडे पाण्याबाबत बोलताना त्यास हरकत घेऊन आपले घोडे दामटल्याने…या चषकात निळवंडे कालवा कृती समितीचे चौकार आणि षटकार पाहायला मिळाल्याने हि चर्चा शहरभर चर्चेचा विषय ठरली आहे.

सदर प्रसंगी आयोजक आणि उपस्थित मान्यवरांनी त्यावेळी अड्.जयंत जोशी व जेष्ठ पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या हस्ते क्रिक्रेट स्पर्धांचे उदघाटन केले आहे.

  

दरम्यान उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात दाखल जनहित याचिकेद्वारे पिण्याचे पाणी कुठून कोठे द्यायचे या याबाबत राज्य सरकारला धोरण घ्यायला भाग पाडले असून त्यानुसार फेब्रुवारी २०१७ मध्ये राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना एक शासन आदेश काढून त्यात,”पिण्याचे पाणी विपुल खोऱ्यातून तुटीच्या पाणी देण्यास फर्मावले आहे.तर तुटीच्या खोऱ्यातून विपुल खोऱ्यात प्रतिबंध केला आहे” तरीही झोपेचे सोंग घेऊन काही असामाजिक तत्व दुष्काळी जनतेचा बळी देत आहे हे केवढे मोठे दुर्दैव आहे.त्यास आजही काही प्रतिष्ठित मंडळी बळी पडत असताना दिसत आहे हे विशेष ! या बाबत निळवंडे कालवा कृती समितीने वांरवार आव्हान दिले आहे ते अद्याप कोणीही स्वीकारले नाही हे आणखी एक विशेष.

कोपरगाव शहराचे पिण्याचे पाणी आणि निळवंडे बंदीस्त जलवाहिनी यांचा प्रश्न गत विधानसभा निवडणुकीपूर्वी तब्बल पाच वर्ष गाजला होता यात भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते विजय वहाडणे व माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे,निळवंडे कालवा कृती समिती आदींनी महत्वाचीं भूमिका निभावली होती.त्यामुळे आ.आशुतोष काळे यांना मोठा विजय मिळाला होता.तर,”तब्बल ६० हजारांचे मताधिक्क्य मिळून आपला विजय होणार” असा नको इतका आत्मविश्वास असलेल्या माजी आ.स्नेहलता कोल्हे यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता.त्यामुळे निवडणूक पार पडल्या पडल्या आ.काळे व तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे आदींनी या प्रकरणाची मोठी धास्ती घेऊन शासनदरबारी पाठपुरावा केल्यामुळे ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधी मिळवला होता.आता त्या तलावाचे काम अंतिम टप्यात आहे.कोपरगाव शहरातील नागरिकांना अधिकचे पाणी मिळण्यासाठी त्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि त्याच्या विभागाकडे पाठपुरावा करून कोपरगाव शहराला आणखी ३.३२ द.ल.घ.मी वाढीव पाणी दि.२ डिसेंबर २०२१ रोजी मंजूर केले होते.आधीचे मंजूर पाणी ५.९६ द.ल.घ.मी.पाणी अवघे ४० टक्केही वापरले जात नसताना अधीकचे पाणी मंजूर का केले ? असा प्रश्न कोणाही सुज्ञास न पडला तर नवल.हा प्रश्न अर्थातच आगामी निवडणुकीत अधिकची जोखीम नको असा त्यामागे विचार असावा असे दिसते.मात्र त्यांनी “निळवंडे धरणाचे पाणी आणायचे टाळले अर्थात त्या मागे मृगजळा मागे धावून उगीच दमायला नको” व ”कोपरगाव शहरातील जनतेचा विश्वासघात व्हायला नको” असा विचार त्यामागे असावा.अर्थात निळवंडे धरणाने गत ५३ वर्षात अनेकांना पाणी पाजले तर अनेकांच्या राजकीय कार्याला जीवनदान (पोळ्या भाजल्या असे म्हणणे प्रशस्त दिसेल) दिले आहे.हे वेगळे सांगायला नको.मात्र माजी आ.कोल्हे यांनी मात्र आपली राजकीय कारकीर्द निळवंडे बंदिस्त जलवाहिणीसाठी (नको असताना) पणाला लावली.मात्र आपल्या आमदारकीच्या काळात त्यांना ते पाणी निळवंडे कालवा कृती समितीच्या कडव्या न्यायिक व आंदोलनात्मक विरोधामुळे अर्थातच शक्य झाले नाही.त्यामुळे त्यांनी येन-केन प्रकारे त्यासाठी प्रयत्न केले मात्र सारे मुसळ केरात गेले होते.हि पार्श्वभूमी सांगायची आज गरज आली त्याला कारण आज तसे घडले आहे म्हणून.आजही त्यांनी उच्च न्यायालयाच्या छ.संभाजीनगर येथील खंडपिठात एक याचिका दाखल (याआधी ती तीनदा फेटाळूनही) करून कोपरगाव शहराच्या दि.०२ डिसेंबर २०२१ रोजी मंजूर ३.३२ द.ल.घ.मी.पाण्यास विरोध केला आहे.व  “कोपरगाव शहराला दारणा धरणाचे पाणी नको तर निळवंडे बंदिस्त जलवाहिनीचे (चेच) पाणी मिळावे” यासाठी याचिका दाखल करून जनतेच्या पैशाचा अपव्यय चालवला आहे.तरीही काही दुष्काळी १३ गावातील काही… “कुऱ्हाडीने दांडे गोतास काळ….” या (पाणी चोर) नेत्यांमागे धावताना दिसत आहे याला काय म्हणावे ? (सदर याचिका वर्तमानात सुरु आहे हे येथे महत्वाचे)

सदर प्रसंगी आयोजक आणि उपस्थित मान्यवरांनी त्यावेळी अड्.जयंत जोशी व जेष्ठ पत्रकार नानासाहेब जवरे यांचा सत्कार केला आहे.

  

उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी १८० गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात असणाऱ्या गावांना अद्याप पिण्याचं पाणी आरक्षण मिळालेले नाही.ते या नेत्यांकडे आणि जलसंपदा विभागाकडे गेली अनेक वर्ष मागूनही त्यांना ऐकू येत नाही.त्यांचे पिण्याचे आरक्षण टाकले तर नाममात्र पाणी शिल्लक राहू शकते मात्र यांनी अद्यापही,”आम्ही दुष्काळी गावांचे पाणी मागत नाही १५ टक्के बिगरसिंचन पाणी आरक्षणातून पाणी मागत असल्याचा कांगावा सुरु ठेवला आहे.या कांगावाखोरांचे वापर करून झाल्यावर पुढे काय होते हे आम्ही सांगायची गरज नाही.


त्याचे झाले असे की,”कोपरगाव शहरात आज सकाळी ११ वाजता कोपरगाव क्रिकेट असोसिएशन,मुंबादेवी तरुण मंडळ व शिवसेना छत्रपती चौक आदींच्या संयुक्त विद्यमाने आयोजित,’सर सेनापती चषक’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे शुभारंभ वकील संघाचे माजी अध्यक्ष जयंत जोशी व पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या हस्ते आयोजित केला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मीबाई देवी ट्रस्टचे अध्यक्ष विकास आढाव हे होते.

   त्यासाठी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे,पीपल्स बँकेचे अध्यक्ष राजेंद्र शिंगी,माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,भाजपचे शहराध्यक्ष डी.आर.काले,उद्योजक प्रसाद नाईक,मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड,लक्ष्मीआई देवस्थानचे अध्यक्ष विकास आढाव,रवींद्र आढाव,वैभव आढाव,संतोष चव्हाणके,मुंबादेवी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुनील फंड,तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर,भंडारा विधानसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख मनोज कपोते,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल,खेलो इंडियाचया तांत्रिक समीतीचे सदस्य राजेंद्र कोहकडे,रवींद्र रोहमारे,माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे,सरपंच बापूसाहेब सुराळकर,तालुका शेतकरी समितीचे तुषार विध्वंस आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

    त्यावेळी प्रास्तविक मकरंद कोऱ्हाळकर यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते संदीप वर्पे यांनी कालवा कृती समितीच्या दुष्काळी जनतेसाठी दिलेल्या लढ्याचे कौतुक केले असताना व त्यानंतर अड्.जयंत जोशी यांचे मार्गदर्शन झाले असताना पत्रकार नानासाहेब जवरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना स्व.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आपला व स्थानिक सेनेचा संबंध वर्णन करून,क्रिकेटच्या स्पर्धा आणि त्याचे आयोजन केल्या प्रकरणी आयोजकांचे कौतुक केले व आयोजकांनी दुष्काळी प्रतिनिधीस बोलायची संधी दिली असल्याबाबद्दल त्यांच्या पाठीवर थाप मारत असताना त्यांनी निळवंडे कालवा समितीच्या कार्याची माहिती देत असताना त्यास उच्च न्यायालयात येसगावातील भूमिपुत्र असलेले विधीज्ञ अजित काळे यांचे तर जिल्हा न्यायालयात अड्.जयंत जोशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे सांगण्यास ते विसरले नाही.त्यावेळी भाजप कोल्हे गटाचे कोपरगाव शहराध्यक्ष काले यांनी भाषणाचे खंडन करत पत्रकार नानासाहेब जवरे यांनी,”जसा दुष्काळी जनतेला न्याय दिला तसा गावातील नेत्यांनी व कार्यकर्त्यानी शहरासाठी का योगदान दिले नाही” असा सवाल करत खाली बसलेल्या एका राष्ट्रवादीच्या नेत्याच्या भाषणाला हरकत घेतली व खडे बोल सूनवायचा अयशस्वी प्रयत्न केला.(अर्थातच त्यांचा रोख वर्पे यांच्यावर असावा असे दिसत होते.) व बंदिस्त जलवाहिणीस साहाय्य न केल्या बाबद ना पसंती व्यक्त केली होती.त्यामळे मूळ क्रिकेट स्पर्धा राहिल्या बाजूला आणि त्या ठिकाणी अर्थातच,’ निळवंडे धरण’,’कालवे’ आणि ‘शिर्डी-कोपरगाव बंदिस्त जलवाहिणीचे ‘षटकार’आणि ‘चौकार’ पडू लागल्याचे दिसून आले आहे.(प्रथमदर्शनी उपस्थितांना हे सर्व हास्य विनोदात सुरु असल्याचे वाटले मात्र त्यानंतर मात्र वास्तव उघड झाले) ते काहीही असो.या प्रकरणी राज्यात सत्तेवर असलेल्या व स्थानिक पातळीवर अपयशी ठरलेल्या नेतृत्वाची,’भलभळती जखम’ मात्र आपल्या समर्थक कार्यकर्त्यांकडून पुन्हा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उघड झाली असल्याचे दिसून आले असल्याचे प्रकर्षाने दिसून आले आहे.त्यामुळे आगामी काळात हि जखम पुन्हा एकदा भलभळणार असे दिसत आहे.व त्याची चर्चा स्थानिक कार्यकर्त्यांत,कोपरगाव शहर आणि तालुक्यात पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरु झाली आहे.

   सदर प्रसंगी आयोजक आणि उपस्थित मान्यवरांनी त्यावेळी अड्.जयंत जोशी व जेष्ठ पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या हस्ते क्रिक्रेट स्पर्धांचे उदघाटन व खेळाडूंचा परिचय केला असून त्या वेळी संदीप वर्पे यांची प्रदेश प्रवक्ते,राजेंद्र कोहकडे यांची तर येसगावच्या सरपंच पदी बापूसाहेब सुराळकर यांची निवड झाल्या प्रकरणी सत्कार केला आहे.तर सूत्रसंचालन मनोज कपोते यांनी केले तर आभार राजेंद्र होन यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close