जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

महाविद्यालयीन तरुणी बेपत्ता,तालुका पोलिसांत नोंद

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील देर्डे फाटा येथील रहिवाशी असलेली व कोपरगाव बेट येथील महाविद्यालयात शास्त्र शाखेत प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेली वीस वर्षीय तरुणी बुधवार दि.११ मार्च रोजी सकाळी सातच्या सुमारास आपण महाविद्यालयात जात असल्याचे सांगून जे निघून गेली ती घरी परतलीच नाही.या बाबत घरच्या व्यक्तींनी आपल्या नातेवाईकांकडे दोन दिवस शोध घेऊनही ती मिळून आली नाही. अखेर मुलीच्या पित्याने कोपरंगाव तालुका पोलीस ठाण्यात सदरची मुलगी हरविल्याची नोंद दाखल केली असून या बाबत देर्डे-फाटा आणि परिसरात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

दरम्यान २०१८ अखेर राज्यात गायब अथवा अपहरण झालेल्या तरुणींची संख्या २ हजार असून शोध लागलेल्या मुलींची संख्या १४२२ असल्याचे माहिती हाती आली आहे.तर न सापडलेल्या मुलींची संख्या ५७८ इतकी आढळली असून बेपत्ता महिलांची संख्या ७०४३ इतकी आहे तर शोध लागलेल्या महिला ४२६४ इतक्या आढळून आल्या आहेत.तर न सापडल्या महिला २७७९ इतक्या आढळून आल्याची माहिती माहिती अधिकारात आढळून आली आहे.

राज्यात मुली आणि महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे.त्यामुळे त्यांचे पालक चिंतेत असून या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.कोपरगाव तालुका आणि शहरही त्याला अपवाद नाही.कोपरगाव शहारातींल महिला आणि महाविद्यालयीन मुलीही लक्षणीयरीत्या गायब होत असल्याने पालकांच्या चिंतेत वाढ होणे स्वाभाविक मानले पाहिजे.त्यातच मुलगी उपवर असेल तर हि चिंता आणखी वाढते.कोपरगाव तालुक्यातील देर्डे फाटा येथूनही शास्त्र शाखेच्या पहिल्या वर्षात शिकत असलेली महाविद्यालयीन तरुणी गायब झाल्याने तिचे पालक सैरभैर झाले आहे.त्यांनी या तरुणीचा आपल्या नातेवाईकांकडे दोन दिवस शोध घेऊनही ती मिळून आली नाही त्यामुळे त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी हरविल्याच्या दप्तरात या घटनेची नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भगवान ढाका हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close