कोपरगाव तालुका
आत्मा मालिकच्या मिना नरवडे यांना पुरस्कार
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलातील हिंदी अध्यापिका व विभाग प्रमुख मिना नरवडे यांना गुणवंत अध्यापक पुरस्काराने गौरविण्यात आले.
या वेळी हिंदी विषयावर कार्यशाळा घेण्यात आली असून या कार्यशाळेला जिल्ह्यातील हिंदी विषयतज्ञ व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांंच्या वतीने पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच यापूर्वी नरवडे यांना महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे यांचे वतीने राज्यस्तरीय आदर्श हिंदी अध्यापक पुरस्कार मिळालेला आहे.
हिंदी ही आपली राजभाषा आहे, या विषयाचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी कार्य करणा–या अध्यापक,अध्यापिकांना अहमदनगर जिल्हा हिंदी अध्यापक सेवा संघाच्या वतीने “गुणवंत अध्यापक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. यावेळी आत्मा मालिक माध्यमिक गुरुकुलातील हिंदी विषय शिक्षिका व ये-जा विभागाच्या विभागप्रमुख मिना अंकुष नरवडे यांनाही हा पुरस्कार शिर्डी येथील साईबाबा कन्या विद्यालय येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. या प्रसंगी शिक्षणाधिकारी दिलीप थोरे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनिल पंडीत,डॉ.नीला बोरणकर-हिंदी विभाग,पुणे, बालभारती अभ्यास मंडळ गटतज्ञ वृंदाताई कुलकर्णी,रविकिरण गळगे,दिपक विसपुते,अहमदनगर जिल्हा हिंदी अध्यापक संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पगारे, आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार मिळाबद्दल आश्रमाचे वतीने आत्मा मालिक माऊली,परमानंद महाराज,विवेकानंद महाराज, निजानंद महाराज,चंद्रानंद महाराज,अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणिस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष-विठ्ठलराव होन , विश्वस्त वसंतराव आव्हाड, प्रकाश भट, प्रकाश गिरमे, बाळासाहेब गोर्डे, सर्व विश्वस्त, व्यवस्थापक हिरामण कोल्हे, प्राचार्य निरंजन डांगे, माणिक जाधव, मिनाक्षी काकडे, सुधाकर मलिक , विभाग प्रमुख रमेश कालेकर, नितीन सोनवणे, वसतिगृह समन्वयक पराग धुमाळ, तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी पालक व शिक्षिकेतर कर्मचारी आदिंनी अभिनंदन केले आहे.