जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

काळे कारखान्याच्या मयत सभासद वारसास दोन लाख भरपाई

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील सभासद गोरक्षनाथ दामोधर लव्हाटे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले होते. कारखाना व्यवस्थापनाने कारखान्याच्या सभासदांचा न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनीकडून सभासदांची विमा पॉलिसी घेतली असल्याने या कंपनीकडे मयत सभासदाच्या अपघात संदर्भातील सर्व कागदपत्र सादर केले होते. न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनीने सर्व कागदपत्रांची खातरजमा करून मयत सभासदाच्या वारसाला दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता.

या नुकसान भरपाईच्या रक्कमेचा धनादेश नुकताच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अशोक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते मयत सभासद स्व. गोरक्षनाथ दामोधर लव्हाटे यांच्या वारस त्यांच्या पत्नी श्रीमती अलका गोरक्षनाथ लव्हाटे यांना देण्यात आला. यावेळी कार्यकारी संचालक गिरीश जगताप, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, सेक्रेटरी बी.बी.सय्यद, डेप्यु. सेक्रेटरी एस. डी. शिरसाठ, विमा कंपनीचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close