कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील…या रस्त्यांस वीस लाख रुपयांचा निधी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या प्रमोद रोहमारे घर ते डोखे घर या रस्त्यासाठी २४ लाख व प्रजीमा ९८ मधुकर औताडे घर ते वैताग मळा डी.पी. (डोऱ्हाळे रस्ता) या रस्त्यासाठी २० लाख रुपये निधी दिला असल्याची माहिती ना.आशुतोष काळे यांनी नुकतीच दिली आहे.
या रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.काळे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.
“मतदार संघातील बहुतांशी गावांनी विधानसभा निवडणुकीत मतांची निर्णायक आघाडी दिल्यामुळे विजयश्री प्राप्त झाली यामध्ये पोहेगाव गटातील अनेक गावांचा देखील समावेश आहे.सुजाण मतदारांनी दिलेल्या आशीर्वादातून उतराई होण्यासाठी इतर गावांप्रमाणे पोहेगाव गटातील गावांना देखील मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी दिला आहे”-ना.आशुतोष काळे.अध्यक्ष श्री साई संस्थान शिर्डी.
या वेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे,सचिन रोहमारे,प्रविण शिंदे,राहुल रोहमारे,मधुकर औताडे,राष्ट्रवादी युवती काँग्रेस तालुकाध्यक्षा वैशाली आभाळे,योगीराज देशमुख,कृष्णा शिलेदार,राहुल जगधने,एम.टी.रोहमारे,संजय रोहमारे,देवेन रोहमारे,जयंत रोहमारे,नंदकिशोर औताडे,राजेंद्र औताडे,वसंत पाचोरे,राजेंद्र पाचोरे,सूर्यभान पाचोरे,ज्ञानेश्वर गव्हाणे,विजय कोटकर,योगेश औताडे,गंगाराम औताडे,अमोल आभाळे,नितीन शिंदे,सुधाकर औताडे,उपकार्यकरी अभियंता प्रशांत वाकचौरे,अभियंता उत्तम पवार,बाळासाहेब जपे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”मतदार संघातील बहुतांशी गावांनी विधानसभा निवडणुकीत मतांची निर्णायक आघाडी दिल्यामुळे विजयश्री प्राप्त झाली यामध्ये पोहेगाव गटातील अनेक गावांचा देखील समावेश आहे.सुजाण मतदारांनी दिलेल्या आशीर्वादातून उतराई होण्यासाठी इतर गावांप्रमाणे पोहेगाव गटातील गावांना देखील मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी दिला असून भविष्यकाळात देखील अनेक मोठी विकास कामे सुरु होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी ना.काळे यांना ‘राज्यमंत्री दर्जा’ मिळाल्याबद्दल व अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वेस-पोहेगाव रस्त्याचे काम मार्गी लावल्याबद्दल मयुरेश्वर इंग्लिश मेडिअम स्कुलचे संस्थापक विलास साळुंके यांनी त्यांचा सत्कार केला.