जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

श्री साई संस्थानला इलेक्टरीक बस द्या-मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्याचे पर्यटन,पर्यावरण,राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे नगर जिल्हा दौऱ्यावर आले असता श्री साईबाबा विमानतळावर श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी साई संस्थानला इलेक्टरीक बसची मागणी केली आहे.त्या वेळी कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या वतीने त्यांचे स्वागत केले आहे.

राज्याचे पर्यटन,पर्यावरण,राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे नगर जिल्हा दौऱ्यावर आले असता शिर्डी विमानतळावर साई संस्थांचे अध्यक्ष ना.काळे यांनी त्यांचे स्वागत केले आहे.

सदर प्रसंगी जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख,श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर,राहुल कनाल,महेंद्र शेळके,जयंत जाधव,डॉ.एकनाथ गोंदकर,सुरेश वाबळे,अनुराधा आदीक,अविनाश दंडवते,अॅड.सुहास आहेर,शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर,मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत,उपकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे,निलेश कोते,गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते,आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने देखील मंत्री ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला आहे.यावेळी श्री साईबाबा संस्थानसाठी इलेक्ट्रिक बसेस मिळाव्या अशी मागणी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांनी पर्यटन,पर्यावरण,राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close