कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील सैनिकांसाठी ‘अमृत जवान सन्मान अभियान’-माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सर्व माजी सैनिक,शहीद सैनिकांचे कुटूंब व कार्यरत सैनिक यांचे विविध विभागातील शासकीय कामे जलदरित्या व प्राधान्याने निपटारा करण्यासाठी येत्या ०७ फेब्रुवारी पासून ‘अमृत जवान सन्मान अभियान’ राबविण्यात येणार आहे.२३ एप्रिल २०२२ पर्यंत ७५ दिवसाच्या कालावधीसाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे.
“सीमेवर तैनात असल्याने व स्वग्रामपासून दूर असल्याने सैनिकांची प्रशासनात अनेक कामे पाठपुराव्या अभावी अथवा वेळेअभावी प्रलंबित असतात. पाठपुरावा करण्यासाठी माहितीगार मनुष्य नसल्याने प्रलंबित राहतात.जिल्हा प्रशासनाच्या वतीने सैनिकांचा सन्मान करण्यासाठी ‘अमृत जवान सन्मान अभियान-२०२२’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”-विजय बोरुडे,तहसीलदार,कोपरगाव.
लोकशाही दिनाच्या धर्तीवर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी ‘अमृत जवान सन्मान दिन’ आयोजित केला जाणार आहे.जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे यांनी दिली आहे.
या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव येथे ‘सहाय्यता कक्ष’ स्थापन करण्यात येणार आहे. कोपरगाव तालुक्यातील कोणत्या शासकीय विभागात सैनिकांची कामे प्रलंबित असतील.त्यांनी ७ फेब्रुवारी २०२२ पासून तालुकास्तरीय सहाय्यता कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन ही तहसीलदार विजय बोरुडे यांनी केले आहे.
सीमेवर तैनात असल्याने व स्वग्रामपासून दूर असल्याने सैनिकांची प्रशासनात अनेक कामे पाठपुराव्या अभावी अथवा वेळेअभावी प्रलंबित असतात. पाठपुरावा करण्यासाठी माहितीगार मनुष्य नसल्याने प्रलंबित राहतात.जिल्हा प्रशासनाच्या वतीने सैनिकांचा सन्मान करण्यासाठी ‘अमृत जवान सन्मान अभियान-२०२२’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी ‘अमृत जवान सन्मान दिन’ आयोजित करुन लोकशाही दिनाच्या धर्तीवर संबंधित विभाग प्रमुख सैनिक अर्जदार यांचे उपस्थितीत सर्व विषयांचा समक्ष आढावा घेतला जाणार आहे.
या अभियानाची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती व तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये एक खिडकी कक्ष या तत्वाप्रमाणे ‘सहाय्यता कक्ष’ स्थापन करण्यात येणार आहेत. या कक्षात दररोज दुपारी १२ ते ०३ या वेळेत कार्यरत सैनिक, माजी सैनिक व त्यांचे निकटवर्तीय यांचे विविध विभागांकडील तक्रार अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.अर्जाचे विभागनिहाय वर्गीकरण करुन संबंधित विभागांकडे ते अर्ज त्याच दिवशी पाठवाण्यात येणार आहेत. या माध्यमातून शासनाच्या इतर सर्व विभागाकडे सैनिकांच्या प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा केला जाणार आहे.तालुकास्तरीय समितीची बैठक ०७ दिवसातून एकदा आयोजित केली जाईल.
या अभियानात तालुक्यातील महसूल,पोलीस,ग्रामविकास यासह सर्व शासकीय कार्यालयांनी सहभाग नोंदवावा.तसेच जास्तीत जास्त सैनिकांनी आपल्या प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी व आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून घेण्यासाठी अभियानात सहभाग नोंदवावा असे आवाहन ही विजय बोरुडे यांनी केले आहे.