जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

माजी महापौर जोशी यांचेवर गुन्हा दाखल करा-कोपरगावात मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी याच्यावर अट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांना दिले असून त्यांच्या वतीने नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांनीं निवेदन स्वीकारले आहे.

“चर्मकार,नाभिक व खाटीक बांधवांच्या भावना दुखावनाऱ्या सामाजिक संकेतस्थळावर केलेल्या टिप्पणी मुळे संदीप जोशी हा इसम मनुवादी आणि जातीवादी असल्याचे स्पष्ट होते व त्याची विचारसरणी अत्यंत घाणेरडी असल्याचे यातुन स्पष्ट झाले असल्याने त्याच्यावर तातडीने अट्रोसिटी कायद्यानुसार कार्यवाही करावी”-अशोक कानडे,जिल्हाध्यक्ष,राष्ट्रीय चर्मकार महासंघ.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी असणारा तसेच नागपुर मनपाचा माजी महापौर संदीप जोशी याने सामाजिक संकेतस्थळावर चर्मकार,खाटीक व नाभिक समाजाच्या बाबतीत आक्षेपार्ह ट्वीट केल्यामुळे या तीनही समाजात तीव्र असंतोष पसरला असुन कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

चर्मकार,नाभिक व खाटीक बांधवांच्या भावना दुखावनाऱ्या सामाजिक संकेतस्थळावर केलेल्या टिप्पणी मुळे संदीप जोशी हा इसम मनुवादी आणि जातीवादी असल्याचे स्पष्ट होते व त्याची विचारसरणी अत्यंत घाणेरडी असल्याचे यातुन स्पष्ट झाले असल्याने त्याच्यावर तातडीने अट्रोसिटी कायद्यानुसार कार्यवाही करावी या मागणीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर विभागाचे अध्यक्ष दिलीप कानडे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव येथे निवेदन देण्यात आले आहे.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या सुचनेनुसार राज्यभरात अशा प्रकारे निवेदन देत कार्यवाही न झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक कानडे,युवा जिल्हाध्यक्ष दत्तात्रय दुशिंग,जिल्हा सचिव संजय पोटे,युवा जिल्हा सचिव संजय सरवार उपजिल्हाध्यक्ष देविदास कानडे,बाळासाहेब वानखेडकर,तालुका अध्यक्ष माधवराव पोटे,युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष तुषार पोटे,राज्य कार्यकारणी सदस्य एम.डी. कानडे,शहराध्यक्ष गणेश कानडे,संतोष कानडे,संकेत कानडे,संतोष दळवी,संतोष बारसे,संतोष शिंदे,सागर पोटे,संकेत कानडे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close