जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सत्तेसाठी देव पाण्यात,स्वप्न “स्वप्नच” राहणार-आ. काळे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार केव्हा पडते आणि पुन्हा निवडणुका कधी लागतात यासाठी कोपरगाव तालुक्यातील कांहींनी आपले देव पाण्यात बुडवून ठेवले आहे. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे घेत असलेले निर्णय पाहता महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार असून काही राजकीय लोकांचे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत असा टीका आ. आशुतोष काळे यांनी माजी आ. स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता कोपरगावातील एका कार्यक्रमात लगावला आहे.

कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कु. श्रुती वढणे होत्या.

याप्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नानासाहेब जाधव, जी.प. सदस्य राजेश परजणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, गटनेते विरेन बोरावके, सतीश कृष्णाणी, सुभाष दवंगे, अॅड. जयंत जोशी, डॉ. गोवर्धन हुसळे, डॉ. अजय गर्जे, अॅड. नितीन पोळ, डॉ. मयूर जोर्वेकर, अशोक खांबेकर, मौलाना मिल्ली, संतोष गंगवाल, सर्व नगरसेवक व्यासपीठावर उपस्थित होते.


पुढे बोलतांना ते म्हणाले की, जनतेने सेवा करण्याची संधी दिली आहे.या संधीचे सोने करतांना सर्वाना सोबत घेवून कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा विकास करायचा आहे.त्यादृष्टीने कोपरगाव शहराच्या नागरिकांना निवडणुकीपूर्वी पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी निवडणुक पार पडल्यानंतर दोनच महिन्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांना भेटून गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीच्या सहकार्याने पाच नंबर साठवण तलावाचे खोदाई काम सुरु केले आहे. कोपरगाव शहरातील भूमिगत गटारी, रस्ते दुरुस्ती, रस्ते सुशोभिकरण आदी कामांसाठी २ कोटी १९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. कोपरगाव शहराची बाजारपेठ फुलविण्यासाठी व विस्थापित टपरी धारकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोकळ्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याचा मानस असल्याचे बोलून दाखवत कोपरगाव शहरातील नागरिकांना अपेक्षित असलेला विकास करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी उपस्थित शहरवासीयांना दिली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देवून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close