जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

उक्कडगावच्या ग्रामस्थांची भागली तहान,तलाव भरला

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वैजापूर –कोपरगावच्या सीमेवर असलेल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघातील उक्कडगावच्या नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात अहंम भूमिका निभावणारा साठवण तलाव क्रमांक १ हा आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून भरला असून उक्कडगावच्या ग्रामस्थांनी आ. आशुतोष काळे यांना धन्यवाद दिले आहेत.


उक्कडगावला पाणी पुरवठा करणारे पाझर तलाव पालखेड कालव्याच्या चारी क्रमांक ५२ मधून भरून द्यावे अशी उक्कडगाव ग्रामस्थांची मागणी होती. परंतु पाटबंधारे विभागाकडून प्रतिसाद मिळत नव्हता.उन्हाची तीव्रता वाढत चालल्यामुळे पाण्याचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला होता. अशा परिस्थितीत पाण्याचे दुसरे कोणतेही स्त्रोत उपलबद्ध नसल्यामुळे पालखेड कालव्याच्या चारी क्रमांक ५२ मधून पाझर तलाव भरून मिळावा यासाठी उक्कडगाव ग्रामस्थांनी आ. आशुतोष काळे यांचेकडे मागणी केली होती. मोठे ढोल बडवून सुरु केलेली उक्कडगावची पाणी पुरवठा योजना काही दिवसातच बंद पडली होती.यापुंर्वीही २०१९ मध्ये भर पावसात पोळा सणाच्या दिवशी उक्कडगावचे शेतकरी पाझर तलाव पालखेड कालव्याच्या चारी क्रमांक ५२ मधून भरून मिळावे यासाठी उपोषणाला बसले होते. याची दखल घेवून उक्कडगावच्या नागरिकांची मागणी लक्षात घेवून आ. आशुतोष काळे यांनी नासिक पाटबंधारे विभागाचे पालखेड कालव्याचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने यांची भेट घेतली. यावर्षी धरणक्षेत्रात समाधानकारक पाणीसाठा आहे.त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची अडचण भासणार नाही. मुबलक पाणीसाठा असतांना नागरिकांना पाण्यावाचून वंचित न ठेवता पालखेड कालव्याच्या चारी क्रमांक ५२ मधून उक्कडगावला पाणी पुरवठा करणारे पाझर तलाव भरून द्यावे अशा सूचना केल्या होत्या. त्या सूचनांचा आदर करून पालखेड कालव्याच्या चारी क्रमांक ५२ मधून पाझर तलाव क्रमांक पूर्णपणे भरला असून उक्कडगावच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.आ. काळे यांनी निवडून आल्यानंतर तातडीने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल उक्कडगावच्या ग्रामस्थांनी आ. आशुतोष काळे यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले. यावेळी दादासाहेब निकम,नानासाहेब निकम, राजेन्द्र निकम, हिरामण गुंजाळ, भाऊसाहेब निकम, नवनाथ निकम, दीपक चव्हाण, रविंद्र निकम आदी मान्यवरांसह उक्कडगावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close