कोपरगाव तालुका
दैत्यगुरु शुक्राचार्य मंदिरात शिवरात्रीची जोरदार तयारी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील कोपरगाव बेट येथील प्राचीन देवस्थान असलेल्या दैत्यगुरु शुक्राचार्य मंदिरात विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने आगामी शिवरात्रीची जोरदार तयारी करण्यात आली असून या उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
शुक्राचार्य हे हिंदू पुराणांनुसार भृगूचे पुत्र व असुरांचे गुरू होते. ऋग्वेदातील उल्लेखांनुसार ते सूक्तद्रष्टे ऋषी होते. हिंदू फलज्योतिषानुसार शुक्र ग्रहाशी याचे ऐकात्म्य मानले जाते.वैवस्वत मन्वंतरातील पुरंदर इंद्राची कन्या जयंती हिच्याशी शुक्राचार्यांचा विवाह झाला. त्यांच्यापासून जयंतीला देवयानी नामक कन्या झाली.शुक्राचार्यांना संजीवनीविद्या प्राप्त असल्याने, असुरांचा राजा वृषपर्वा याने त्यांचे शिष्यत्व पत्करले व त्यांच्या त्या विद्येच्या आधाराने युद्धांत देवांचा वारंवार पराभव केला.देवगुरु बृहस्पती पुत्र कच व दैत्य गुरु शुक्राचार्यांची कन्या देवयानी यांची प्रेमकथा याच ठिकाणी रंगली याचे उल्लेख प्राचीन साहित्यात सापडतात.
शिवरात्री महोत्सव या वर्षी शुक्रवार दि.२१ फेब्रुवारी रोजी विश्वस्त मंडळ मोठ्या धामधुमीत साजरे करणार असून या वर्षीचा शिवरात्रीचा योग्य ११७ वर्षांनी जुळून आला आहे.त्यासाठी आयोजकांनी मंदिराची रंगरंगोटी केली असून मंदिर परिसर विविधरंगी विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे.त्यादिवशी गुरु शुक्राचार्य पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.त्या दिवशी दैत्यगुरु शुक्राचार्य यांची विधिवत पूजाअर्चा करण्यात येणार आहे.येणाऱ्या भाविकांना सामुदायिक अभिषेकाची व्यवस्था करण्यात आली आहे.या वर्षी मंदिर प्रशासनाने मंदिर द्वारात भव्य हत्ती शिल्पाची निर्मिती केली असून या वर्षी ते मोठे आकर्षण ठरणार आहे.रविवार दि.२३ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री उत्सवानंतर सायंकाळी ६ वाजता येणाऱ्या भक्तासाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आला आहे.या महाप्रसादाचा कोपरगाव व तालुक्यातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा ससे आवाहन श्री कोपरगाव बेत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड. सचिव एस.डी. कुलकर्णी, विश्वस्त दिलीप कोऱ्हाळकर,सुहास कुलकर्णी, हेमंत पटवर्धन, आदींनी केले आहे.