कोपरगाव तालुका
पाठ्यपुस्तकातील लेखकांनीच साधला विद्यार्थ्यांशी संवाद

संपादक-नानासाहेब जवरे
कान्हेगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील हँरिसन ब्रँच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांशी लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत इयत्ता ४ थी बालभारती पुस्तकातील ‘मिठाचा शोध’या धड्याच्या लेखिका अंजलीताई अत्रे यांनी नुकताच व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला आहे.

लेखिका अंजलीताई यांनी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची अगदी दिलखुलास पणे उत्तरे दिली.त्यांनी विद्यार्थ्यांना बोधपरअशा तीन कथा सांगितल्या.मधमाशी मध कशाप्रकारे गोळा करतात.कृत्रिमरित्या मधाचे संकलन कशे केले जाते.याबद्दल सविस्तर माहिती अंजलीताईंनी विद्यार्थ्यांना दिली.तसेच मोबाईल व टि.व्ही.मुळे डोळ्यांवर काय परिणाम होतात.त्याचे आपल्या शरीरावर अवयवांवर काय परिणाम होतात.याची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली.व विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले.तसेच उघड्यावरचे पदार्थ खाऊ नये,स्वच्छतेचे सहा संदेश गोष्टीरुपाने विद्यार्थ्यांना सांगितले.
असं म्हणतात मुले ही देवाघरची फुले असतात म्हणून मी जरी शिक्षिका नसले तरी मला मुलांमध्ये रमायला व त्यांच्याशी गप्पा मारायला व गोष्टी सांगायला खूप आवडते.अगदी असंच आज त्यांच्याबरोबर संवाद साधताना आम्हा विद्यार्थी व शिक्षकांना वाटत होतं.आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी गप्पा व मूल्यवर्धक गोष्टी सांगण्यासाठी मी पून्हा येईलं.असे म्हणून विद्यार्थी व शिक्षकांचा अंजलीताईंनी निरोप घेतला.शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या खास शैलीत टाळ्या वाजवून अंजलीताईंना धन्यवाद दिले.
हॕरिसन ब्रँच शाळेतील शिक्षक हे विद्यार्थीच्यां विकासासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात.लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम कौतुकास्पद असा आहे असे गौरवोद्गार केंद्रप्रमुख दिलीपराव ढेपले यांनी यावेळी काढले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षिका मनिषा शिंपी यांनी केले तर आभार मुख्याध्यापक नवनाथ सूर्यवंशी यांनी मानले.