कोपरगाव तालुका
गौतम यूरो किड्समध्ये शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम यूरो किड्समध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांचे ३९० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नूर शेख यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. यावेळी यूरो किड्सच्या हेडमिस्टेस विमल राठी उपस्थित होत्या.
यावेळी यूरो किड्सच्या चिमुकल्यांनी विविध वेषभूषा परीधान करून शिवराज्याभिषेक सोहळा, महाराज व अफजलखान भेट आदी प्रसंगाचे सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे आदी सरदार व मावळे यांच्या वेषातील चिमुकले, त्यांच्या हातातील भगवे झेंडे व जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी वातावरण शिवमय झाले.
शिवाजी महाराजांच्या वेषभूषेत नर्सरी मधून आयांश काळे, अक्षद सेठी, पार्थ बोलगमवार, श्रीजित उर्कीडे, जय जाधव तसेच ज्यूनियर क्लासमधून राजवीर काळे, देवराज शेळके व सिनियर क्लासमधून आयुष्यमान काळे तर सईबाईच्या भूमिकेत आर्या शेटे, साची गोसावी, आरोही कापडनिस, स्वरा कदम तसेच तानाजी मालुसरे यांची भूमिका आकाश बोलगमवार, अफजलखानाची भूमिका मोईन शेख याने साकारली व इतर चिमुकल्यांनी मावळयांची भूमिका साकारली.शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये गौतम युरो किड्स सुरू करण्यात आलेले असुन यास पालकांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी प्रवेश प्रक्रीया सुरू झालेली आहे. शिवजंयती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेडमिस्टेस विमल राठी, सर्व शिक्षिक, यूरो किड्सचे विद्यार्थी व पालक आदींनी मोलाची भूमिका बजावली आहे.