जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात..या महिला बचत गटाच्या मॉलचे उदघाटन संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील महिला बचत गट आणि स्थानिक महिला उद्योजिका,व्यवसायिकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ओमप्रकाश कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली समता नागरी सहकारी पतसंस्था आणि समता महिला बचत गट यांच्या माध्यमातून समताज सहकार मिनी मॉल हे महिलांनी तयार केलेल्या उत्पादित मालाचे विक्री केंद्र सुरु केले असंल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था संचलित सहकार उद्यमी व समता महिला बचतगट यांच्या संयुक्तपणे समताज सहकार मिनी मॉल चे उद्घाटन समता नागरी सहकारी पतसंस्थेत जळगाव जिल्हा सरपंच परिषदेच्या जिल्हाध्यक्ष सुषमा देसले यांच्या शुभ हस्ते १७ जानेवारी २०२२ रोजी मोठया उत्साहात करण्यात आले आहे.

सदर प्रसंगी कोपरगाव नगर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या सातभाई,विद्या सोनवणे,उज्वला जाधव,समता पतसंस्थेच्या व्हा.चेअरमन श्वेता अजमेरे,संचालिका शोभा दरक आदी मान्यवर उपस्थित होत्या.

‘समता सहकार उद्योगिनी’ पुरस्कार लता चौधरी,किरण डागा,किरण दगडे,राजश्री गुजराथी, रुपाली अमृतकर,सिमरन खुबाणी,शालिनी खुबाणी,भारती गोयल,रेखा भंडारी,योगिता कोठारी, निकिता रोडे,रश्मी कडू,राधिका शिरोडे,कीर्ती बागरेचा,स्मिता पोळ,मिताली लोंगाणी,श्रेया मालकर,नेहा ठोळे,श्वेता बंब,स्तुति ठोळे,श्रेया अजमेरे,सारिका काले,अपर्णा बज,स्वाती उराडे, जानव्ही आढाव,छाया अबक,अर्चना अजमेरा,विद्या सोनवणे,शिल्पा अजमेरा,असमत नबील, छाया ओस्तवाल,सिमरन मंटाला,मनीषा काले,नीलम लोहाडे आदि महिलांना देण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक समता महिला गटाचे अध्यक्ष सुहासिनी कोयटे यांनी केले.उपस्थितांना मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी समता महिला बचत गटाच्या महिलांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि उपस्थितांचे आभार समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती संदीप कोयटे यांनी मानले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close