जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दुचाकींचा अपघात,एक ठार,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या पूर्वेस साधारण अठरा कि.मी.अंतरावर असलेल्या तळेगाव मळे ग्रामपंचायत हद्दीत मुंबई-नागपूर महामार्गावर दि.२४ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास मयत आरोपी सागर अशोक गाडेकर (वय-२९) रा.स्वामी समर्थ नगर वैजापूर जिल्हा औरंगाबाद याने आपल्या ताब्यातील हिरो होंडा कंपनीची हंक जातीची दुचाकी क्रं.एम.एच.२० डी.एच.८९३४) हि भरधाव वेगाने चालवून रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून स्वतःचे मृत्यूस व फिर्यादी शुभम दिगंबर पाटील (वय-२५) रा.यशवंत कॉलनी डेपो रोड वैजापूर यांचे कमीअधिक नुकसानींस कारणीभूत झाला असल्याची फिर्याद फिर्यादी शुभम पाटील याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

विश्‍व स्‍वास्थ्य संघटना विविध देशातील सरकारी व स्‍वयंसेवी संस्‍था सोबत मिळून रस्‍तयावरील अपघात टाळण्‍याकरिता वर्णनात्मक सुचना तयार करत आहेत.ज्‍यात हेलमेटचा वापर करणे,वाहन चालविताना सिट बेल्‍ट आवश्‍यक लावणे, मदयपान करुन गाडी न चालवणे,अधिक वेगाने गाडी न चालवणे इत्‍यादींचा समावेश आहे.तरीही काही नागरिक बेजबाबदार पणे रस्त्यावर वाहन चालवून स्वतःच्या व दुसऱ्याच्या नुकसानीस कारणीभूत ठरत असतात अशीच घटना कोपरगाव तालुक्यात तळेगाव मळे गावात घडली आहे.

जगात दरोरोज सुमारे ३४०० लोक रस्‍तयावर अपघातामुळे मृत्‍युमुखी पडतात.१० लक्ष दक्ष लोकांना इजा होत असते किंवा ते अपंग होत असतात.रस्‍त्‍यांवर लहान मुले वयोवृध्‍द व सायकल चालवणा़याना अपघाताचा सर्वात जास्‍त धोका संभवतो. विश्‍व स्‍वास्थ्य संघटना विविध देशातील सरकारी व स्‍वयंसेवी संस्‍था सोबत मिळून रस्‍तयावरील अपघात टाळण्‍याकरिता वर्णनात्मक सुचना तयार करत आहेत.ज्‍यात हेलमेटचा वापर करणे,वाहन चालविताना सिट बेल्‍ट आवश्‍यक लावणे, मदयपान करुन गाडी न चालवणे,अधिक वेगाने गाडी न चालवणे इत्‍यादींचा समावेश आहे.तरीही काही नागरिक बेजबाबदार पणे रस्त्यावर वाहन चालवून स्वतःच्या व दुसऱ्याच्या नुकसानीस कारणीभूत ठरत असतात अशीच घटना कोपरगाव तालुक्यात तळेगाव मळे गावात घडली आहे.त्यात एकाचा मृत्यू तर त्याचा सहकारी जखमी झाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की.फिर्यादी शुभम पाटील व त्याचा मयत सहकारी सागर गाडेकर हे आपल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना मयताने आपल्या ताब्यातील वरील क्रमांकाची दुचाकी हि भरधाव वेगाने चालवून स्वतःच्या मृत्यूस व त्याचा सहकारी शुभम पाटील याच्या कमी अधिक दुखापतीस कारणीभूत झाला असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आज दाखल केली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी मयत आरोपी सागर गाडेकर याचे विरुद्ध गु.क्रं.१८/२०२२ भा.द.वि.कलम ३०४(अ) २७९,३३७,३३८,४२७,मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरिक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एन.एस.शेख हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close