जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या,कोपरगावात अकस्मात मृत्यूची नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील ईशान्येस साधारण ०३ कि.मी.अंतरावर असलेले अंबिकानगर या उपनगरातील रहिवासी व पुण्यात नोकरी करून शिक्षण घेत असलेली तरुणी कु.क्षितिजा प्रदीप निकुंभ (वय-२४) हिने आपल्या राहत्या घराच्या छतास दुपारी दोन नंतर घरात कोणी नाही अशा वेळी आपल्या ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक माहिती सायंकाळच्या सुमारास उघड झाली आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मयत महाविद्यालयीन तरुणीचे छायाचित्र.

दि.१५ मार्च रोजी आपली आई हि मामाकडे मनमाड येथे तर वडील हे दुपारी ०२ वाजेच्या सुमारास आपल्या रासायनिक कारखान्यातील आपल्या कंपनीत गेले असता घरी कोणी नाही हि संधी साधत मयत तरुणीने सायंकाळी ७.२४ वाजेच्या पूर्वी कधीतरी घरातील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने स्टूलचा वापर करत गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहरातील अंबिकानगर येथे प्रदीप निकुंभ या उद्योजकांचे कुटूंब राहात असून कुटुंबात आई,वडील व एक भाऊ असे सदस्य आहेत.मयत तरुणी हिचे माध्यमिक शिक्षण हे शारदा इंग्लिश स्कूल येथे झाले होते.त्या नंतर तिने पदवी पर्यंत शिक्षण हे कोपरगाव येथील संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन ती पदवी पश्चात शिक्षण घेण्यासाठी एक वर्षांपूर्वी पुण्यात गेली होती.तेथे तिला एम.बी.ए.साठी प्रवेश घेण्याचे काम सुरु असताना ‘ती’ एका प्रसिद्ध कंपनीत पुण्यात नोकरी करत होती.हुशार असलेली हि महाविद्यालयीन तरुणी काही दिवसापूर्वी कोपरगाव येथे आपल्या कुटूंबातील आई वडील यांना भेटण्यासाठी घरी आली होती.मात्र ती अस्वस्थ होती.त्यात तिने दि.१५ मार्च रोजी आपली आई हि मामाकडे मनमाड येथे तर वडील हे दुपारी ०२ वाजेच्या सुमारास आपल्या रासायनिक कारखान्यातील आपल्या कंपनीत गेले असता घरी कोणी नाही हि संधी साधत तिने सायंकाळी ७.२४ वाजेच्या पूर्वी कधीतरी घरातील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने स्टूलचा वापर करत गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.

दरम्यान सायंकाळी वडील सात वाजेच्या सुमारास घरी आले असता घराचे दार त्यांना बंद आढळले असता त्यांनी आवाज देऊन पाहिला मात्र त्यास तिने त्यांच्या आवाजाला घरातून प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्यांना संशय आला असता त्यांनी मागील दरवाजा बळाचा वापर करून उघडला होता.तो उघडल्यानंतर त्यांना घरातील हे विदारक चित्र आढळून आले आहे.त्यानंतर त्यांनी तातडीने याबाबत तिंच्यावर उपचार करण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केलं आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.मात्र सदर तरुणीच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.त्याबाबत तपासी अधिकाऱ्यांना त्या बाबत अद्याप काही खुलासा झालेला नाही.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसौन्दर यांनी अकस्मात मृत्यूची नोंद दाखल केली आहे.घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी भेटी दिली आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.१८/२०२३ सि.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close