जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

अतिक्रमणात अडथळा आणणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करू-इशारा

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील रस्त्यावर अनेक नागरिकांनी काही नगरसेवकांच्या आशीर्वादाने आपल्या पथाऱ्या थाटल्या असून त्यामुळे पुन्हा एकदा शहराचा श्वास कोंडण्यास प्रारंभ झाला आहे.या चुकीच्या कामांना पाठीशी घालून आपली दुकानदारी चालविणाऱ्यानी आता तरी आपल्या मर्कटलीला बंद कराव्या अन्यथा आपल्याला कारवाईचा बडगा उगारावा लागेल असा इशारा कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकताच एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे.

महसूल आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन मार्च २०११ मध्ये अखेर अतिक्रमण काढण्याचा बऱ्याच दिवसाचा प्रलंबित कार्यक्रम उरकून घेतला होता त्यात जवळपास २१०० दुकानदार विस्थापित झाले होते.त्या नंतरही,” विस्थापितांचे पुनर्वसन” या गोंडस नावाखाली अनेकांनी आपली निवडणुकीची व मतांची दुकाने थाटली होती.तर काहींनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धारणगाव रस्त्यावर निवडणूक पाहून “रांगोळ्या” काढल्याचे अनेकांच्या स्मरणात असेल.

कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दीत वर्षानुवर्ष अतिक्रमण करणे हा आपला “विशेष हक्क” असे समजून अनेकांनी शहराचे विद्रुपीकरण केले होते. विशेष म्हणजे यात या अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना वर्षांनुवर्षे नगरसेवक म्हणून राहिलेल्या व काही पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांनी पाठीशी घालून शहराच्या विद्रुपिकरणास हातभार लावलेला आहे.त्यामुळे अखेर महसूल आयुक्तांनी मार्च २०११ मध्ये अखेर अतिक्रमण काढण्याचा बऱ्याच दिवसाचा प्रलंबित कार्यक्रम उरकून घेतला होता त्यात जवळपास २१०० दुकानदार विस्थापित झाले होते.त्या नंतरही,” विस्थापितांचे पुनर्वसन” या गोंडस नावाखाली अनेकांनी आपली निवडणुकीची व मतांची दुकाने थाटली होती.तर काहींनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धारणगाव रस्त्यावर निवडणूक पाहून “रांगोळ्या” काढल्याचे अनेकांच्या स्मरणात असेल.मात्र नुकतेच कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी २८ फेब्रुवारी २०२० रोजी संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत,”असे अतिक्रमण करणाऱ्यांचे पुनर्वसन करण्याचा कुठलाही कायदा नाही.व अशी जबाबदारी शासनावर व नगरपरिषदेवर कधीही येत नाही”.असे सर्वपक्षीय नगरसेवकांना स्पष्ट बजावल्याने आजवर अनेक पुढाऱ्यांनी विस्थापितांना फसविण्याचे पातक केल्याचे उघड झाले आहे.या राजकीय पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकाला महत्व प्राप्त झाले आहे.

काहींच्या हस्तक्षेपामुळे रहदारीच्या कोंडीला जबाबदार असलेले अडथळे, शेड काढता येत नाही. त्यामुळे नगरवासीयांचा असा समज होतो कि,”नगरपरिषद काहीच कारवाई करत नाही. खरे तर सर्वसाधारण सभेत कुणीही अडथळे काढायला, अतिक्रमणे काढायला विरोध करायचा नाही असे ठरलेले असतांनाही असा चुकीचा विरोध करणे वर्तमानात सुरू आहे. सर्वसामान्य जनतेला काही ठिकाणी रस्त्याने चालणे अवघड झाले आहे-वहाडणे.

त्या पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे कि,कोपरगाव नगरपरिषदेचे काही नगरसेवक व काहींचे कुटुंबीय शहरातील रस्त्यावर असलेले अडथळेही काढायला विरोध करतात. नगरपरिषदेचे कर्मचारी असे अडथळे काढण्याचा प्रयत्न करतात. पण काहींच्या हस्तक्षेपामुळे रहदारीच्या कोंडीला जबाबदार असलेले अडथळे, शेड काढता येत नाही. त्यामुळे नगरवासीयांचा असा समज होतो कि,”नगरपरिषद काहीच कारवाई करत नाही. खरे तर सर्वसाधारण सभेत कुणीही अडथळे काढायला, अतिक्रमणे काढायला विरोध करायचा नाही असे ठरलेले असतांनाही असा चुकीचा विरोध करणे वर्तमानात सुरू आहे. सर्वसामान्य जनतेला काही ठिकाणी रस्त्याने चालणे अवघड झाले आहे. विशेषतः महिला, विद्यार्थी, जेष्ठ नागरिकांची फारच कुचंबणा होते. इतरांची अतिक्रमणे, अडथळे आधी हटवा असे प्रत्येकजण म्हणायला लागल्यास अंदाधुंदी माजून शहरात वावरणे कठीण होईल. तरीही काहीजण आडमुठेपणा करून नगरपरिषदेच्या कामात अडथळे आणत आहेत. आपले व्यक्तीगत संबंध टिकविण्यासाठी असे वागणे बरे नव्हे. त्या विरोधात नाईलाजाने, कामात अडथळे आणणारे काही नगरसेवक व त्यांचे कुटुंबीय यांची नांवे शासनाकडे कळवावी लागतील असा इशारा वहाडणे यांनी देऊन अजूनही वेळ गेलेली नाही, कोणकोणत्या पक्षाचे आहेत याचा विचार न करता मलाही भूमिका घेऊन कारवाई करावी लागेल.कृपया संबंधितांनी आपले वर्तन सुधारावे.अजूनही वेळ गेलेली नाही. पद जपण्यासाठी आपण गप्प बसु असा गैरसमज कुणीही करून घेऊ नये. पदापेक्षा शहरातील नागरिक महत्वाचे आहेत याचे भान सर्वांनीच ठेवले पाहिजे. स्वतःच्या जागा, दुकाने भरमसाठ भाडे-डिपॉझिट घेऊन दुसऱ्याना द्यायचे व स्वतः मात्र रस्त्यावर बसून धंदा करायचा, रहदारीला अडथळे आणायचे हे उद्योग आता कुठेतरी थांबवावे असा इशाराही अध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close