जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

स्वच्छता अभियानासह विशेष कार्य करणाऱ्यांचा सत्कार संपन्न

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव नगरपरिषद महिला व बालकल्याण समिती व दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान यांच्या संयुक्त विद्यामाने जागतिक महिला दिनानिमित्त महात्मा गांधी प्रदर्शन हॉॕल साईबाबा तपोभूमी येथे जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सपकाळ यांचे आत्मकथन “आईच्या काळजातून”मोठ्या उत्साहात संपन्न झाले असून त्यावेळी शहर स्वच्छता अभियान व जलशक्ती अभियानात विशेष कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला आहे.

याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुताई सपकाळ यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.याप्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती ताराबाई जपे,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,माजी उपनगराध्यक्ष वाजे, आरोग्य सभापती अनिल आव्हाड, पाणीपुरवठा सभापती निखाडे, सभापती शिक्षण समिती मंगल आढाव, नगरसेवक विद्याताई सोनवणे, सपना मोरे, वर्षा शिंगाडे,मंदार पहाडे, विरेन बोरावके, संदीप वर्पे, मेहमूद सय्यद, उमा वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी कोपरगांव नगरपरिषदेच्या सफाई कामगार ते मुख्याधिकारी, सर्व सन्मानीय नगरसेवक, उपनगराध्यक्ष व नगराध्यक्ष प्रत्येकांनीच मोठे योगदान स्वच्छ भारत अभियान व जलशक्ती अभियानात दिले आहे. कर्मचा-यापैकी प्रातिनिधीक स्वरुपात सफाई कामगार सुमन दगडू ठोकळ, शिला भरत चावरे व शकीला जहूर सय्यद यांचा सन्मान करण्यात आला.

सदर प्रसंगी शहरातील नागरिकांनी व संस्थांनी स्वच्छ भारत अभियान व जलशक्ती अभियानात भरीव योगदान दिल्याबदल नगरपरिषदेच्या वतीने प्रशस्तीपञ व सन्मानचिन देवुन गौरविण्यात आले. यात कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी जलशक्ती अभियानांतर्गत तलावातील गाळ काढण्या कामी पोकलॅन्ड मशीन उपलब्ध करून दिले. तसेच स्वच्छ सर्वेक्षण मध्ये सिटीझन फीडबॅक याकामी भरीव योगदान देवून या कार्यक्रमासाठी महात्मा गांधी प्रदर्शन हॅाल मोफत उपलब्ध करून दिला.संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,गोदावरी दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,संजय काळे व त्यांचे सहकारी गेल्या २५६ आठवड्या पासून शहरातील विविध भागात स्वच्छता मोहिम राबवत आहे.ओमप्रकाश कोयटे, पाणी बचाव समिती यांचे जलशक्ती अभियानांतर्गत तलावातील गाळ काढणे कामी मोलाचे सहकार्य तसेच स्वच्छ सर्वेक्षण मध्ये सिटीझन फीडबॅक याकामी भरीव योगदान.आदिनाथ ढाकणे, मागील ६८ आठवड्या पासून गोदावरी नदी स्वच्छता अभियान राबवत असून, पाणी बचाव समिती यांचे जलशक्ती अभियानांतर्गत तलावातील गाळ काढणे कामी मोलाचे सहकार्य तसेच स्वच्छतादूत सुशांत घोडके,हिरालाल महानुभाव, सत्येन मुंदडा, सुधीर डागा, रविंद्र बोरावके, प्रसाद नाईक, राजेश ठोळे, कांतीलाल वक्ते व सुमित भट्टड, संजय उदावंत, अध्यक्ष लायन्स,अध्यक्ष लायनेस,अध्यक्ष लिओ क्लब प्राचार्य, एस.एस.जी.एम महाविद्यालय,प्राचार्य, के.जे.एस. महाविद्यालय चंद्रशेखर भोंगळे, दादा पोटे, आदींनी स्वच्छ सर्वेक्षण मध्ये सिटीझन फीडबॅक याकामी भरीव योगदान दिल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

या प्रसंगी जीवनात कितीही संकटे आली तरी खचून न जाता परिस्थितीला सामोरे गेले तर जीवनात यश मिळाल्याशिवाय रहात नाही. महिलांनी, मुलींनी कितीही शिक्षण घेतले तरी आपले संस्कार,संकृती, वेशभूषा, परिवार यांचा विसरून पडू देऊ नये असा मोलाचा सल्ला सिंधू ताईंनी दिला.
स्वतःचा जीवन संघर्ष कथन करून उपस्थितांना अंतर्मुख केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी, सर्व विभागाचे प्रमुख, सर्व अधिकारी व कर्मचारी आदीनी परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमास बहूसंख्येने शहरातील महिला बचतगटांच्या सदस्या, नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी तर सूत्रसंचलन महारुद्र गालट यांनी केले तर उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close