कोपरगाव तालुका
डॉ.सोनाली चिने यांना पी.एच.डी.पदवी प्रदान
संपादक-नानासाहेब जवरे
कोळपेवाडी-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत हद्दीतील सुकन्या व संजीवनी अभियांत्रिकी विद्यालयाच्या प्राध्यापक डॉ.सोनाली शंकरराव चिने यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा, विद्यापीठ,औरंगाबाद येथून रसायन शास्त्र विषयात पी. एच. डी. पदवी नुकतीच प्राप्त झाली आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
डॉ. किशन ज्ञानदेव थेटे पाटील प्राध्यापक पी.व्ही. पी. महाविद्यालय लोणी यांच्या सुविद्य पत्नी व कुंभारीचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद शंकरराव चिने यांची भगिनी आहेत. त्यांना देवगिरी महाविद्यालय,अौरंगाबाद येथील डॉ. प्रा. सि. एस. पाटील यांनी मार्गदर्शन केले होते.