नगर जिल्हा
…त्या पोलिसांना तीन दिवसांची पोलीस कोठडी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
एका खटल्यातून फिर्यादीचे नाव वगळण्याची पाच हजाराची लाच घेताना शिर्डी येथे रंगेहात पकडण्यात आलेले शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रशांत मिसळ व महेश पालवे यांना कोपरगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती राहुल भागवत यांनी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती ती संपल्या नंतर त्यांना नुकतेच न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची प्रत्येकी पंधरा हजारांच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
शिर्डी येथे एका गुन्ह्यातून फिर्यादी संजय कोळपे यांचे नाव वगळण्यासाठी त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रशांत मिसाळ व महेश पालवे यांच्याशी संपर्क साधला होता त्यावेळी त्यांनी मोठ्या रकमेची मागणी केली होती.त्यावेळी फिर्यादी संजय कोळपे यांनी नाशिक लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला होता.त्यांनी हि कामगिरी अहमदनगर लाचलुचपत विभागाकडे सोपवली होती,त्यावेळी त्यांनी लाचखोर पोलिसांना पकडण्यासाठी सापळा लावला होता.त्यांनी तडजोड करून पाच हजार रुपये घेण्याचे काबुल केले होते.त्यासाठी नगर लाचलुचपत विभागाच्या पोलिसानी शिर्डी येथील पोलीस ठाण्याच्या परिसरातील एका चहाच्या हॉटेलात हि रक्कम देण्याचे ठरवले त्यावेळी त्यांना पाच हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले त्यांच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानां नुकतेच कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.त्यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेऊन आरोपीना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
सदरची कोठडी नुकतीच संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना प्रत्येकी पंधरा हजारांच्या वैयक्तिक जामिनावर न्यायालयाने सोडून दिले आहे.सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभोयोक्ता अशोक वाहाडणे यांनी काम पाहीले होते.