कोपरगाव तालुका
यशासाठी खडतर परिश्रमाशिवाय पर्याय नाही – आ. आशुतोष काळे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आयुष्यात मोठ व्हायचं असेल तर खडतर परिश्रमाशिवाय पर्याय नाही परिस्थितीवर मात करून अनेकांनी आयुष्यात यश मिळवले आहे प्रयत्नाने माणसाला यशाची सर्व हिमशिखरे हमखास गाठता येतात त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीवर तरुणाईला नक्कीच यश मिळविता येत असल्याचे प्रतिपादन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी कोळपेवाडी येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या सुरेगाव-कोळपेवाडी येथील रयत संकुलात श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय व श्री. छत्रपती संभाजी विद्यालयाच्या वतीने वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे,जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक ज्ञानेश्वर हाळनोर, स्थानिक शाळा समितीचे सदस्य संभाजी काळे, शिवाजीराव वाबळे, बाबुराव कोल्हे, कचरू कोळपे, रमेश ताम्हाणे, बाळासाहेब ढोमसे, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, वसंतराव कोळपे, रामनाथ काळे, आण्णासाहेब बढे, बाळासाहेब चव्हाण, भाऊसाहेब लुटे, श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य सुखदेव काळे, राधाबाई काळे कन्या विद्यालयाच्या प्राचार्या छाया काकडे, श्री. छत्रपती संभाजी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पाचोरे तसेच शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, आपल्याला कोण व्हायचं हे अगोदर ठरवा त्यादृष्टीने चांगला अभ्यास करा व अभ्यासाबरोबरच इतर छंद देखील जोपासा. गुणवतांना प्रत्येक क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत.त्यामुळे आपण सर्वात चांगले काय करू शकतो याचा शोध घेवून त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. समाजात डॉक्टर,अभियंता यांच्याबरोबर उत्कृष्ट कलाकार, साहित्यिकाची सुद्धा गरज आहे याची जाणीव ठेवा. आयुष्यात रात्री स्वप्न पाहणारे कधीही यशस्वी होत नाही.आयुष्यात स्वप्न बघायला शिका मात्र ती स्वप्न दिवसा बघा आणि पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवून यशस्वी व्हा असेही ते शेवटी म्हणाले. यावेळी आमदारपदी निवड झाल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांचा रयत संकुलाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य सुखदेव काळे यांनी केले. सूत्रसंचलन शिवाजी जुंधारे व संजय रणशिंग यांनी केले तर आभार राजेंद्र पाचोरे यांनी मानले.