कोपरगाव तालुका
महाराजस्व अभियानाचा लाभ घ्या-आ.आशुतोष काळे

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक असणारे शासकीय दाखले त्यांच्याच गावात मिळावे व त्यासाठी त्यांना होणारा त्रास कमी व्हावा या उद्देशातून कोपरगाव विधानसभा मतदारसंघात महाराजस्व अभियान राबवले जात असून या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी यावेळी केले आहे.
सर्व सामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी संबधित दैनंदिन प्रश्न सत्वर निकालात काढणे व महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या दृष्टीने राज्यात “महाराजस्व अभियान” हा महत्वाकांक्षी कार्यक्रम सर्व जिल्ह्यामध्ये दिनांक १ ऑगस्ट, 2015 पासून राबविण्याचा शासन निर्णय घेत आहे.
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे महाराजस्व अभियानाचे उदघाटन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे, सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक अशोकराव तिरसे,राजेंद्र मेहेरखांब,सूर्यभान कोळपे,गौतम बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र ढोमसे, कोळपेवाडीचे उपसरपंच डॉ.प्रकाश कोळपे, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, उपसरपंच सुनील कोळपे, कुंभारीचे सरपंच प्रशांत घुले, कोळगाव थडीचे सरपंच विलास निंबाळकर, शहाजापुरचे उपसरपंच बाळासाहेब ढोमसे, राधु कोळपे, कचरू कोळपे, वसंतराव कोळपे, ज्ञानेश्वर कोळपे, गंगाधर चव्हाण आदी मान्यवरांसह कोळपेवाडी व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले कि,२०१९ला पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने निवडून देवून सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मतदार संघातील जनतेचे आभार मानणे आवश्यक होते परंतु आभार मानण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटावे यासाठी मी प्राधान्य देत आहे त्यामुळे आपल्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.शासन समाजातील विविध वर्गातील घटकांसाठी अनेक योजना राबवीत आहे मात्र या योजनांची सविस्तर माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे अनेक लाभार्थी शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतांना येत असलेल्या अडचणी दूर होवून त्यांना आवश्यक असलेले शासकीय दाखले तातडीने मिळावे यासाठी महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले
कार्यक्रमाचे प्रास्तविक करतांना तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले की, आ.काळे निवडून आल्यानंतर त्यांनी सवर्प्रथम महसूल विभागाची बैठक घेतली त्यामुळे महसूल विभागाचे अनके प्रश्न मार्गी लागले.महाराजस्व अभियान यापूर्वी खूप कमी प्रमाणात राबविले गेल्यामुळे तातडीने हे अभियान घेण्यास सांगितले.नागरिकांना त्यांच्याच गावात शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी केलेला पाठपुरावा व त्यांचे अतिशय सूक्ष्म नियोजन असल्यामुळे कोळपेवाडी येथे महाराजस्व अभियान उपक्रम घेण्यात आला असून भविष्यात संपूर्ण तालुक्यात हा उपक्रम प्रभावीपणे राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी कोळपेवाडी, कोळगाव थडी, सुरेगाव, शहाजापूर, माहेगाव देशमुख, कुंभारी, वेळापूर आदी गावातील नागरिकांना शिधापत्रिका, विविध दाखले आ. काळे यांच्या हस्ते देण्यात आले. या उपक्रमा दरम्यान नागरिकांना येणाऱ्या अडचणी त्यांनी समजून घेत शासकीय अधिकाऱ्यांना त्या अडचणी सोडविण्याच्या सूचना केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले तर आभार मंडल अधिकारी बाबासाहेब जेडगुले यांनी मानले. यावेळी शासकीय दाखले घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले तर आभार मंडल अधिकारी बाबासाहेब जेडगुले यांनी मानले. यावेळी शासकीय दाखले घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.