कोपरगाव तालुका
मतदार संघातील समस्यांना दिले प्राधान्य -… या नेत्यांचे प्रतिपादन
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
मतदार संघातील जनतेने सेवा करण्याची संधी दिली त्यावेळी कोणत्या गावाने किती मताधिक्य दिले हे न पाहता केवळ समस्या पहिल्या असून त्यामुळे संपूर्ण मतदार संघाचा विकास होवून मतदार संघातील रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर झाली असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील आ.आशुतोष काळे यांनी आपल्या निधीतून संवत्सर येथील ७० लक्ष रुपये खर्चून संवत्सर (दशरथवाडी) ते दहेगाव रस्त्याच्या डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी राष्ट्रवादी,काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी,विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”मतदार संघाच्या विकासासाठी ३ हजार ४०० कोटी निधी मिळविला त्यामुळे मतदार संघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यात मोठी मदत झाली.मतदार संघातील पूर्व भागातील अनेक गावांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या अनेक रस्त्यांना निधी दिला.यामध्ये संवत्सर देखील मागे नाही.संवत्सर (दशरथवाडी) ते दहेगाव हा रस्ता देखील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा होता.त्याबाबत नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार निधी देवून हा रस्त्याचा प्रश्न सोडविला आहे.३० बेडचे ग्रामीण रुग्णालय,मनाई वस्ती औद्योगिक वसाहत,संवत्सर-कान्हेगाव रस्ता,पवार गिरणी-संवत्सर-भोजडे-धोत्रे रस्ता,तलाठी कार्यालय अशा महत्वपूर्ण कामांसह रस्ते व विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी देवून पूर्व भागात रस्ते,वीज,पाणी,आरोग्य या मुलभूत समस्या मार्गी लावून विकासाच्या बाबतीत पूर्व भागाला न्याय दिला.आपण केलेल्या विकासकामांची पावती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मला मिळणारच आहे मात्र जास्तीत जास्त मताधिक्य वाढविण्याची जबाबदारी तुमची आहे असे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना शेवटी केले आहे.सदर प्रसंगी त्यांनी २२.७८ कोटी रुपये निधीतून सुरु असलेल्या संवत्सर ग्रामीण रुग्णालयाच्या कामाची पाहणी केली आहे.