जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

‘सर्वोच्च’चा शेतकऱ्यांवर ‘अ’न्याय ?

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

पुणे -(प्रतिनिधी)

प्रदूषणच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार,पंजाब व हरियाणा सरकारला फटकारले आहे व शेतकऱ्यांवर शेतातील पाचट जाळण्याच्या मुद्द्यावरून त्यांना  कडक शिक्षा का करीत नाही याचा जाब विचारला आहे.पर्यावरण संरक्षण कायदा,1986- कलम 15 मध्ये एक लाख रुपयांपर्यंत दंड व पाच वर्षे तुरुंगवासाची तरतूद आहे.

“शेतातील पाचट व काडीकचरा जाळल्याने जमिनीची सेंद्रिय कर्ब कमी होते.जमिनीतील उपयुक्त जीवाणू,मित्र किडी मरतात.त्यामुळे या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची जरुरी आहे.दिल्ली आंदोलनामध्ये सुद्धा,त्यांच्या अनेक मागण्यांपैकी ही एक मागणी होती की,”या कायद्यातील शिक्षेच्या तरतुदी पासून शेतकऱ्यांना सूट मिळावी”- सतिष देशमुख,पुणे.

   शेतकरी वर्षातून एकदाच पाचट जाळतात,तेही एकाच वेळी नाही.तिकडे एकट्या दिल्लीमध्ये दररोज 1.2 कोटी वाहने (Delhi Statistical Handbook 2023) रस्त्यावर काळा धूर ओकत असतात.शिवाय दसरा,दिवाळी,होळी मधील फटाकेबाजीच्या धुराने आकाश काळवंडून जाते.औद्योगिक प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही.

सोबत: प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या कारणांचा तक्ता

खबरदार जर शेतकऱ्यांना गुन्हेगार ठरवले तर प्रथम त्यांना शिक्षा करा जे दररोज प्रदूषण करतात

   कापणी नंतर राहिलेल्या गव्हाचे काड आणि उसाचे पाचट मध्ये लिगनीन (Lignin- hard to disintegrate) नावाचा चिवट पदार्थ असतो जो लवकर कुजत नाही.त्याला तीन ते चार महिन्याचा कालावधी लागतो.शेतातील तणाचे मशीन द्वारे बारीक तुकडे करून,कंपोस्टिंग वापरून किंवा या बायोमास पासून गॅस निर्मिती करणे असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.परंतु ते खूप खर्चिक आहेत.त्यासाठी सरकारने अनुदान देण्याची जरुरी आहे.तसेच या विषयावर कृषी विद्यापीठाकडून काडीचेही संशोधन झालेले नाही.शेतातील पाचट व काडीकचरा जाळल्याने जमिनीची सेंद्रिय कर्ब कमी होते.जमिनीतील उपयुक्त जीवाणू,मित्र किडी मरतात.त्यामुळे या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची जरुरी आहे.दिल्ली आंदोलनामध्ये सुद्धा,त्यांच्या अनेक मागण्यांपैकी ही एक मागणी होती की या कायद्यातील शिक्षेच्या तरतुदी पासून शेतकऱ्यांना सूट मिळावी.

शेतकरी हे देशाच्या जडणघडणीतील अविभाज्य घटक आहेत.त्यांच्या वर फौजदारी कारवाई करण्यापेक्षा त्यांचे हित जपून त्यांना इतर पर्याय उपलब्ध करून देणे जरुरी आहे.
सर्वोच्च न्यायालयाला,ह्या विषयाचा सर्वांगीण अभ्यास न करता अशी भाषा वापरणे शोभत नाही असा टोलाही सतिष देशमुख यांनी लगावला आहे.

सतीश देशमुख,

B.E.(Mech.),पुणे,अध्यक्ष,फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स,पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close