नगर जिल्हा
अकरा गावातील नागरिकांना सापत्नपणाची वागणूक नको –आ. आशुतोष काळे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या राहाता तालुक्याच्या ११ गावातील नागरिकांना सापत्नपणाची वागणूक देऊ नका त्यांना येणाऱ्या अडचणी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी तातडीने सोडवाव्या.नागरिकांना जर जाणून बुजून त्रास होत असेल खपवून घेतले जाणार नाही असा इशारा आ.आशुतोष काळे यांनी राहाता येथे एका कार्यक्रमात बोलताना दिला आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या राहाता तालुक्याच्या ११ गावातील नागरिकांसाठी तसेच कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गटातील ज्या गावातील नागरिकांना विविध शासकीय कामासाठी राहाता तालुकयातील विविध शासकीय कार्यालयात जावे लागते अशा नागरिकांसाठी कोपरगाव तालुक्याचे आ.काळे यांनी राहाता येथे पंचायत समिती कार्यालयात गुरुवार (दि.६) रोजी नागरिकांना शासकीय कार्यालयाकडून येत असलेल्या अडचणी जाणून घेण्यासाठी व त्यावर उपाय योजना करण्यासाठी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. या जनता दरबारासाठी विविध खात्याचे अधिकारी तसेच प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, विमान प्राधिकरण संचालक दीपक शास्त्री, सार्वजनिक बांधकाम अभियंता ए स.आर.वर्पे, शाखा अभियंता दिलीप गाडे, उपअभियंता एस.सी. वैष्णव, तालुका आरोग्य अधिकारी एस. के. गायकवाड,राष्ट्रीय महामार्ग डेप्युटी मॅनेजर अनिल गोरड,कोपरगाव आगार व्यवस्थापक अभिजित चौधरी, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.ए. एस.भांड आदी शासमोय कर्मचारी तसेच गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते,रोहिदास होन,नंदकुमार सदाफळआदी मान्य वरांसह राहाता तालुका राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
या जनता दरबारासाठी विविध खात्याचे अधिकारी तसेच प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, विमान प्राधिकरण संचालक दीपक शास्त्री, सार्वजनिक बांधकाम अभियंता ए स.आर.वर्पे, शाखा अभियंता दिलीप गाडे, उपअभियंता एस.सी. वैष्णव, तालुका आरोग्य अधिकारी एस. के. गायकवाड,राष्ट्रीय महामार्ग डेप्युटी मॅनेजर अनिल गोरड,कोपरगाव आगार व्यवस्थापक अभिजित चौधरी, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.ए. एस.भांड आदी शासमोय कर्मचारी तसेच गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते,रोहिदास होन,नंदकुमार सदाफळआदी मान्य वरांसह राहाता तालुका राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
आज झालेल्या जनता दरबारात खंडेराव वहाडणे, बाळासाहेब वहाडणे, बाळासाहेब सांबरे,संपत शेळके, विठ्ठल शेळके,बाबासाहेब बाभुळके, बाळासाहेब उगले,चांगदेव गायकवाड,मुरलीधर थोरात, प्रभाकर गुंजाळ,रमेश गोर्डे,पोपट चौधरी, संजय धनवटे, संपत वहाडणे, भास्कर चौधरी, शंकर चव्हाण,भाऊ गुंजाळ आदी नागरिकांनी तक्रारी आ. आशुतोष काळे यांच्यासमोर मांडल्या.
या जनता दरबारासाठी विविध खात्याचे अधिकारी तसेच प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, विमान प्राधिकरण संचालक दीपक शास्त्री, सार्वजनिक बांधकाम अभियंता ए स.आर.वर्पे, शाखा अभियंता दिलीप गाडे, उपअभियंता एस.सी. वैष्णव, तालुका आरोग्य अधिकारी एस. के. गायकवाड,राष्ट्रीय महामार्ग डेप्युटी मॅनेजर अनिल गोरड,कोपरगाव आगार व्यवस्थापक अभिजित चौधरी, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.ए. एस.भांड आदी शासमोय कर्मचारी तसेच गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते,रोहिदास होन,नंदकुमार सदाफळआदी मान्य वरांसह राहाता तालुका राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
आज झालेल्या जनता दरबारात खंडेराव वहाडणे, बाळासाहेब वहाडणे, बाळासाहेब सांबरे,संपत शेळके, विठ्ठल शेळके,बाबासाहेब बाभुळके, बाळासाहेब उगले,कैलास राहणे,चांगदेव गायकवाड,मुरलीधर थोरात, प्रभाकर गुंजाळ,रमेश गोर्डे,पोपट चौधरी, संजय धनवटे, संपत वहाडणे, भास्कर चौधरी, शंकर चव्हाण,भाऊ गुंजाळ आदी नागरिकांनी तक्रारी आ. आशुतोष काळे यांच्यासमोर मांडल्या.
या जनता दरबारात नेहमीप्रमाणे सर्वात जास्त तक्रारी या महावितरण संदर्भात होत्या. शेतीसाठी वेळेवर व पूर्ण क्षमतेने वीज मिळत नाही.महिन्याभरापासून विद्युत रोहित्रे जळाले आहे ते बदलून मिळत नाही.तारतंत्री फोन उचलत नाही उचलले तर अरेरावी करतात.घरकुल मंजूर असूनही स्वतःची जागा नसल्यामुळे घरकुलाचा लाभ मिळत नाही.मागील पाच वर्षांपासून पुणतांबा-रामपूर रस्त्याची दुरवस्था झाली त्या रस्त्याने सोयीचे पायी चालता येत नाही.वाकडी गावातील ६०० शेतकरी आजही अवकाळी पावसाच्या झालेल्या नुकसान भरपाई पासून वंचीत आहे.पुणतांबा-कोपरगाव रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.रांजणगाव देशमुख परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून अनेक शेतकऱ्यांचे वीज पंप चोरीला गेले आहे.काही दिवसांपूर्वी शेतकरी शेतीला पाणी भरीत असतांना रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने त्या शेतकऱ्याचा खून केला आहे.विमान प्राधिकरण भूमीपुत्रांचा विचार करीत नाही अशा अनेक तक्रारी नागरिकांनी या जनता दरबारात मांडल्या.आ.आशुतोष काळे यांनी सर्व नागरिकांच्या समस्या ऐकून घेत संबंधीत अधिकाऱ्यांना त्या समस्या का सुटल्या नाहीत या समस्या तातडीने सोडवा अशा सूचना केल्या.शासकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारी समजावून घेतल्या पाहिजे व या तक्रारींचे निराकरण करुन त्यांचे समाधान केले पाहिजे परंतु असे होतांना दिसत नाही उलट अधिकाऱ्याकडून या जनतेची अडवणूक होतांना दिसत आहे. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नागरीकांकडून पैसे घेऊ नका अशा सक्त सूचना आ.काळे यांनी या जनता दरबारात सर्व शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. निवडून आल्यानंतर त्यांनी मतदारसंघातील जनतेला एक न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. या जनता दरबारासाठी मोठ्या संख्येने नागरिक आपल्या समस्या घेवून आले व त्यांनी या जनता दरबारात आपल्या समस्या मांडल्या.यावेळी राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत श्रीमती अलका बापू शेळके यांना रुपये वीस हजाराचा धनादेश आ. काळे यांच्या हस्ते देण्यात आला.तसेच संजय गांधी योजनेत समाविष्ट झाल्या बद्दल चे निवडपत्र लाभार्थ्यांना आ. काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.