जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव शहरात धारदार शस्र जप्त,तिघांवर कारवाई

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर पोलिसानी कोर्ट रोड परिसरात केलेल्या कारवाईत दोघा युवकांचा संशय आल्याने त्यांना थांबवून त्यांची झाडाझडती घेतलीय असता त्यांच्या पिशवीत दोन धारदार तलवारी आढळून आल्याने पोलिसानी त्यांच्यावर सदरच्या तलवारी जप्त करत कारवाई केली आहे.या घटनेने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान या घटनेतील खडकी येथील एक आरोपी बाजार समिती परिसरातील काचेच्या दुकानात काम करत असून दुपारच्या वेळेत त्याने जेवण करून येतो म्हणून आपल्या मालकाकडून त्यांची दुचाकी नेहमीप्रमाणे घेऊन जाऊन हा प्रताप केला असल्याने या काच मालकाच्या डोक्याला ताप वाढल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

कोपरगाव शहरात वर्तमान काळात रस्ता लूट करणाऱ्या दोन टोळ्या शहर पोलिसानी पकडल्या असून रास्ता लुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले आहेत.त्यामुळे त्यांचे संशयित नागरिकांच्या हालचालीवर कटाक्षाने लक्ष असते.त्यातच कोपरगाव शहरात मंगळवार दि.४ फेब्रुवारी रोजी दोन संशयित तरुण आपल्या दुचाकीवरून (क्रं.एम.एच.१७ बी.के.७५५१) लोखंडी पिशवीत काही वस्तू घेऊन जात असताना दिसून आले.त्याबाबत कोपरगाव परिसरात असलेले पोलीस शिपाई अंबादास रामनाथ वाघ यांनी त्याबाबत त्यांना हटकले असता त्यांच्या पिशवीची झाडाझडती घेतली असता त्यात त्यांना २५० रुपये किमतीची ८२ सेंटीमीटर लांबीची पितळी मूठ असलेली तर दुसरी ७८ सेंटीमीटर लांबीची लाकडी मूठ असलेली अशा दोन तलवारी आढळून आल्या आहेत.या बाबत कोपरगाव शहर पोलिसानी आरोपी संजय हरिभाऊ आरणे (वय-२५),दीपक रमेश गायकवाड (वय-२०) संतोष जनार्दन गोतीस (वय-३२)सर्व राहणार खडकी कोपरगाव यांचे विरुद्ध गु.र.न.५२/२०२० भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कोरेकर हे करीत आहेत.या घटनेतील आरोपी पोलिसानी अटक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close