कोपरगाव तालुका
…या गावात झाली ६३ हजारांची चोरी,अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या पूर्वेस साधारण पंधरा कि.मी. असलेल्या कासली ग्रामपंचायत हद्दीत सुनंदा लक्ष्मण नेहरे (वय-५०) हे त्र्यंबक या तीर्थक्षेत्री काही धार्मिक विधी करण्यासाठी गेले असता यांच्या वस्तीवर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आतील वीस हजार रुपये रोख,दोन तोळे सोन्याचे दागिने,एक दूरदर्शन संच, एक छताचा पंखा,एक मिक्सर असा ६३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.त्यामुळे कासली, शिरसगाव शिवारात भीतीचे वातावरण पसरले आहे.
फिर्यादी महिला सुनंदा नेहरे या आपला धार्मिक विधी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबक या ठिकाणी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह गेले असताना त्यांच्या वस्तीवर पाळत ठेऊन असणाऱ्या अज्ञात चोरट्याने नेमकी संधी साधत रात्रीच्या सुमारास त्यांच्या घराचे कुलूप तोडून त्या घरातील कपाटातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने,छताचा पंखा, मिक्सर.एक दूरदर्शन संच असा एकूण ६३ हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव शहरापासून कासली ग्रामपंचायत साधारण पंधरा कि.मी.असून या गावात शिरसगावच्या बाजूने दीड किमी अंतरावर फिर्यादी महिला सुनंदा नेहरे यांची वस्ती आहे.त्यांच्या आजूबाजूलाही अन्य वस्त्या असून ते आपला धार्मिक विधी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबक या ठिकाणी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह गेले असताना त्यांच्या वस्तीवर पाळत ठेऊन असणाऱ्या अज्ञात चोरट्याने नेमकी संधी साधत रात्रीच्या सुमारास त्यांच्या घराचे कुलूप तोडून त्या घरातील कपाटातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने,छताचा पंखा, मिक्सर.एक दूरदर्शन संच असा एकूण ६३ हजारांचा ऐवज लंपास केला आहे.फिर्यादी महिला सुनंदा नेहरे व त्यांचे कुटुंबीय जेंव्हा घरी आले त्यावेळी हा झाला प्रकार त्यांच्या लक्षात आला.त्यावेळी त्याठिकाणी त्यांना शिरसगाव येथील एका इसमाचे आधार कार्ड आढळून आले.त्यामुळे चोरटे हेच असावे असा समज या कुटुंबीयांचा झाला होता व त्यांनी अनेकाजवळ तो बोलूनही दाखवला होता मात्र आमच्या प्रतिनिधीने या बाबत तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्याच रात्री शिरसगाव हद्दीत दुसरा गुन्हा घडला होता.व पटेल यांच्या घराबाहेरची बॅग घेऊन चोरटे पसार झाले होते ती बॅग ते कासली गावात घेऊन आले व ती योगायोगाने नेहेरे यांच्या वस्तीवर पडल्याने तो गैरसमज झाला होता.या बाबत आमच्या पोलिसानी खातर जमा केली असून त्या कुटुंबाची पार्श्वभूमी गुन्हेगारीची नसल्याचे सिद्ध झाले आहे असे कळवले आहे.