कोपरगाव तालुका
गुरू ऋणनिर्देश कार्यक्रम उत्साहात संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव ग्रामपंचायत हद्दीतील रयत शिक्षण संस्थेच्या श्री ग.र.औताडे माध्यमिक विद्यालयातील १९८९-९० या वर्षातील विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचे ऋण निर्देश व्यक्त करण्यासाठी नुकतेच एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
गुरु हे मुख्यतः दोन प्रकारचे असू शकतात. एक अंतर्गत आणि एक बहिर्गत. पण एक सच्चा शिष्य बहिर्गत गुरूस कालांतराने त्याचा अंतर्गत गुरु होण्यास भाग पाडतो.
पिश्चीला नावाचे आध्यात्मात एक तंत्र ( हे तंत्र मंत्र मधील तंत्र नव्हे) आहे. त्यानुसार गुरु हा दोन प्रकारचा असतो. एक असतो दीक्षा गुरु आणि एक असतो शिक्षा गुरु.तसेच कुलागम नावाचे आध्यात्मात अजून एक तंत्र आहे. त्यानुसार गुरु हा ५ प्रकारचा असतो.प्रेरक, सूचक, वाचक, दर्शक, बोधक, शिक्षक हे ते ५ प्रकार.गुरुचे आपल्या शिष्याला योग्य मार्ग दाखवणे, त्याला स्वार्थाकडून परमार्थाकडे नेणे, किंवा सद्गुरूच्या जवळ जाण्याची वाट दाखवणे ही कर्तव्ये असतात. आता सगळ्या बाजूने विचार केल्यास ही सर्व कर्तव्ये योग्य वेळी योग्य ते मार्गदर्शन ह्यात मोडतात.या गुरूंचे स्मरण ठेवणे आधुनिक काळातही नक्कीच गरज आहे.ती पोहेगाव येथील माजी विद्यार्थ्यांनी नुकतीच दाखवून दिली आहे.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी श्री ग.र. औताडे पाटील माध्यमिक विद्यालया मध्ये १९८९-९० साल च्या माजी विद्यार्थ्यांचा तसेच गुरुजनांचा ऋणनिर्देश सोहळा संपन्न झाला आहे.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मुख्याध्यापक श्री कोकाटे हे होते.
या प्रसंगी विद्यालयाचे श्री गमे सर तसेच शिक्षक श्रीमान कुकडे सर, श्री डाके सर, श्री आढाव सर,श्री पाटणे सर, श्री गायधने सर, श्री देशमुख सर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व मान्यवर पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कुरकुटे सर म्हणाले तीस वर्षाच्या मोठ्या कालखंडानंतर विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला कार्यक्रम आम्हाला गुरुजनांना प्रेरणादायी ठरला असून आणि यातूनच आम्हाला अपेक्षित विद्यार्थी घडला असल्याचे गौरवोद्गार काढले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक बाळासाहेब रहाणे यांनी केले तर कार्यक्रमासाठी राजू गायकवाड ,नीलेश बोरा आदी माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले त्यानंतर उपस्थितांना स्नेहभोजन आयोजित केले होते.