कोपरगाव तालुका
कोपरगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याचे जोरदार स्वागत
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतातच नव्हे तर जगाला प्रेरणा देणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पंधरा वर्षापासून वादग्रस्त ठरलेला पूर्णाकृती पुतळ्याचे आज कोपरगावात प्रथमच मोठ्या जल्लोषात नगराध्यक्ष विजय वहाडणे,आ.आशुतोष काळे,अण्णाभाऊ साठे पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुखदेव जाधव,अड.नितीन पोळ,विनोद राक्षे,शरद त्रिभुवन व त्यांच्या शहरातील सर्व सहकाऱ्यांनी भंडाऱ्याची जोरदार उधळण व फटाक्याची आतषबाजी करत व डोली बाजाच्या निनादात स्वागत केले आहे.त्यामुळे शहरातील अनेक वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे.
तुकाराम भाऊराव साठे (१ ऑगस्ट १९२०-१८ जुलै १९६९) हे अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक,लोककवी आणि लेखक होते.साठे एका मांग (दलित) समाजामध्ये जन्मलेले व्यक्ती होते.त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते.साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते,सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले.मात्र कोपरगाव शहरात केवळ श्रेयवादावरून या पुतळ्याचे गेली अनेक वर्षे अनावरण टाळले जात होते मात्र आता आज मुहूर्त लाभला असून आज भंडाऱ्याची उधळण करत फटक्यांची आतषबाजी करत नगराध्यक्ष विजय वहाडणे,पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुखदेव थोरात,अड.नितीन पोळ,विनोद राक्षे,शरद त्रिभुवन व त्यांच्या सहकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले आहे.
कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे नियोजन बैठक नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीतीत नुकतीच तहसीलदार विजय बोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या एक मताने दि.२६ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पुतळा आणण्याचा निर्णय घेतला होता.तो मुहूर्त आज साधला गेला असून साईबाबा कॉर्नर येथे या पुतळ्याचे नगराध्यक्ष विजय वहाडणे,माजी आ.कोल्हे,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र सोनवणे,जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे,मुख्याधिकारी शांताराम गोसावी,नगरसेवक मंदार पहाडे,मेहमूद सय्यद,संदीप पगारे,भाजप गटनेते रवींद्र पाठक,वैभव गिरमे,वर्षा शिंगाडे,फकीर कुरेशी,शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील गंगूले,उपाध्यक्ष अशोक आव्हाटे,साठे पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुखदेव थोरात,बाळासाहेब सोळसे,संजय सोळसे,अड.नितिन पोळ,शरद त्रिभुवन,विनोद राक्षे,सुखदेव जाधव,शहर राष्ट्रवादीचे नगरपरिषद गटनेते विरेन बोरावके,राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष नवाज कुरेशी,अल्ताफ कुरेशी,अड.नितीन पोळ,कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,विनोद राक्षे, माजी नगरसेवक सोमनाथ म्हस्के,नितीन साबळे,शरद त्रिभुवन,जयवंत मरसाळे,राजेंद्र बागुल,शंकर बिऱ्हाडे,आरोग्य निरीक्षक सुनील आरणे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी हा पुतळा आणण्यासाठी अनंत अडचणी असताना आपली प्रतिष्ठा पणाला लावत आज पुतळा आणला असला तरी त्यांच्या स्वागताचा व नावाचा फलक वा कोनशीला कुठेही आढळली नाही मात्र पश्चिम व ईशान्य गडावरील नेत्यांचे व अन्य विविध संघटनांचे स्रेयवादाचे फलक लावायला लोकशाहीर साठे पुतळा परिसरात जागा उरली नव्हती हे विशेष!
सव्वा तासांच्या मिरवणुकीनंतर दुपारी १.१५ वाजेच्या सुमारास एक अजस्र क्रेनच्या साहाय्याने हा पुतळा प्रस्तावित जागेत १.३० वाजता स्थानापन्न करण्यात आला आहे.त्यावेळी विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या घटनेनिमित उपस्थितांना लाडू वाटप करून आनंद व्यक्त केला आहे.
या वेळी कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,भरत दाते व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.