जाहिरात-9423439946
विविध पक्ष आणि संघटना

कोपरगावातून…या राष्ट्रवादीचा अद्याप निर्णय नाही !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्याचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांना घेऊन बंडाचे निशाण फडकविल्यापासून राज्यभर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून कोण कोणाचे समजायला तयार नाही कोपरगावात मोठ्या पवारांचे दिपक साळुंके वगळता आ.आशुतोष काळे परदेश दौऱ्यावर असल्याचे सांगितले जात असून जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे आपला दूरध्वनी उचलत नाही त्यामुळे कोणाचा कोणाला मेळ नसल्याचे दिसत असून आ.काळे हे शक्यतो आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना सोडणार नाही असे दिसत आहे.तर उर्वरित नेते काय भूमिका घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

एका माहितीनुसार ते कोपरगाव तालुक्यात परदेशातून आलेले असून त्यांनी या गोंधळात जाऊन आपले हसे करून घेण्यास नकार दिला असल्याची माहिती हाती आली असून काही कार्यकर्त्यांचा दावा ते अजित पवार यांच्या दि.०२ जुलैच्या शपथविधीच्या दिवशी जुना मुंबई-नागपूर महामार्गाच्या लगत कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका येथील रेल्वे पुलाच्या पुर्वेस हाकेच्या अंतरावर असलेल्या एका,’हॉटेल मध्ये असल्याची गुप्त माहिती हाती आली असून त्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण शपथविधी पाहिला असल्याची बातमी आहे.मात्र कार्यकर्ते आणि पदाधिकारी,हॉटेल चालक यांनी त्यास अधिकृत दुजोरा दिलेला नाही.त्यामुळे त्याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस सचिन मुजगुले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचा कोपरगाव शहरात लावलेला पहिला फलक.

राज्याच्या राजकारणात शिवसेनेच्या बंडानंतर दूसरा मोठा भूकंप झाला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी पक्षाविरूद्ध बंड पुकारत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. एवढंच नाही तर आपल्यासोबत ३५-४० आमदार आणि काही खासदार घेवून अजित पवार बाहेर पडले.त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना आपल्या अन्य आठ सहकाऱ्यांना सामावून घेतले आहे.राज्यात कोणालाही कानोकान खबर नसताना अजित पवारांनी हा निर्णय घेतला.पण दादांनी या बंडाची तयारी आधीच झाली केली होती आणि त्यामागे काही महत्वाची कारण देखील असल्याचं बोललं जातयं.अजित पवारांच्या या बंडामागची सुरुवात झाली ती २०१९ पासुन अर्थात चर्चित पहाटेच्या शपथविधीपासुन असे मानले जात आहे.मात्र त्याधीची आपल्याला सन-२०१४ आणि २०१७ साली अशी दोनदा शरद पवारांनीं हि संधी दिली होती” असा आरोप अजित पवारांनी केला आहे.मात्र पाठवून नंतर जेष्ठ नेते शरद पवार यांनीच जायला सांगून आपल्याला तोंडघशी पाडले असल्याचा त्यांचा आरोप आहे.त्यावरून आरोप प्रत्यारोप यांच्या फैरी झडत आहे.नुकतीच शरद पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघात येऊन भुजबळांना आव्हान दिले आहे.अकोलेतील आ.डॉ.किरण लहामटे हे अद्याप तळ्यात मळ्यात आहेत.तर राहुरीचे आ.प्राजक्त तनपुरे यांनी आधीच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना आपला पाठींबा देऊन टाकला आहे.त्यांचे मामा व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शरद पवार यांचे सोबत असल्याने त्यांची सोबत मोठ्या पवारांबरोबर असणे स्वाभाविक मानले जात आहे.नेवासा मधील घुले परिवार अजित पवारांची भेट घेऊन आल्याच्या बातम्या आहेत.मात्र कोपरगावचे आ.आशुतोष काळे मात्र अमेरिकेत असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत असून ते आपला दूरध्वनी उचलत नसल्याने कोपरगाव मतदार संघात कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एका माहितीनुसार ते कोपरगाव तालुक्यात परदेशातून आलेले असून त्यांनी या गोंधळात जाऊन आपले हसे करून घेण्यास नकार दिला असल्याची माहिती हाती आली असून काही कार्यकर्त्यांचा दावा ते अजित पवार यांच्या दि.०२ जुलैच्या शपथविधीच्या दिवशी जुना मुंबई-नागपूर महामार्गाच्या लगत असलेल्या तालुक्यातील दहिगाव बोलका येथील,’हॉटेल’ येथे असल्याची गुप्त माहिती हाती आली असून त्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण शपथविधी पाहिला असल्याची बातमी आहे.मात्र कार्यकर्ते आणि पदाधिकारी,व हॉटेल चालक यांनी त्यास अधिकृत दुजोरा दिला नाही.त्यामुळे त्याबाबत जनतेत संभ्रम असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान यातील एक पदाधिकारी दिपक साळुंके मात्र आमच्या प्रतिनिधीस नुकतेच भेटले असून त्यांनी मात्र आपण राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे सोबत असल्याचे सांगितले आहे.तर अजून एक पोहेगाव येथील राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस सचिन मुजगुले यांनी मात्र आपण राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांचे सोबत असल्याचे निसंदिग्ध ग्वाही दिली आहे.व त्यासाठी कोपरगाव शहरतील बस स्थानकालगत असलेल्या धारणगाव रस्त्या लगत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर त्या समर्थनार्थ अभिनंदनाचा जाहीर फलक लावला आहे.

याबाबत आमच्या प्रतिनिधीने याबाबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”आपण आ.आशुतोष काळे ज्यांच्या सोबत असतील त्याच्या सोबत जाणार असल्याचे सांगून आ.काळे म्हणतील तोच आपला पक्ष राहणार” असल्याचे सांगीतले आहे.

याशिवाय राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांचेशी संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही.तथापि तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी यांचेशी मिळतीजुळती प्रतिक्रिया असल्याचे मानले जात आहे.

त्यामुळे आ.आशुतोष काळे आल्यानंतरच यावर त्यांच्या पक्षीय पातळीवरील कार्यकर्त्यांचा विचार घेऊन अंतिम निर्णय होईल असा कयास व्यक्त होत आहे.त्यामुळे आगामी दोन दिवस तरी यावर काहीही निर्णय होणार नाही असे स्पष्ट दिसत आहे.त्यामुळे आ.काळे यांच्या निर्णयाकडे अध्यक्ष शरद पवार यांचेसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह वरिष्ठ मंत्र्यांचे व तालुक्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close