जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावच्या विकासाला चालना देण्यासाठी सत्तेची गरज-आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

माजी आ.अशोक काळे यांच्या कार्यकाळात हजारो विद्यार्थी तसेच असंख्य नागरिकांची नियमित वर्दळ असलेल्या एस.जी.एम.महाविद्यालयासमोरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र त्यानंतर रस्त्याची दुरवस्था होऊनही या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले होते.यावरून कोपरगाव शहराचा विकास रखडला असल्याचे सिद्ध होत असून रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी कोपरगाव नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

“कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शहरविकासासाठी जास्तीत जास्त निधी आणलेला आहे व यापुढेही आणणार आहे.मात्र आलेला निधी वेळेत खर्च होऊन होणाऱ्या विकासकामांचा शहरवासीयांना उपयोग होणे गरजेचे आहे. त्यासाठी ज्यांच्याकडे पालिकेची सत्ता आहे त्यांच्याकडे विकासाची मानसिकता असणे देखील महत्वाचे आहे”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष श्री साईबाबा संस्थान शिर्डी.

कोपरगाव शहरात प्रभाग क्र.४ मध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ३१ लक्ष ०१ हजार रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या एस.एस.जी.एम.महाविद्यालयासमोरील रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे तसेच २३ लक्ष ६६ हजार रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या नगर-मनमाड हायवे ते साईधाम मंदिर रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की,”कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शहरविकासासाठी जास्तीत जास्त निधी आणलेला आहे व यापुढेही आणणार आहे.मात्र आलेला निधी वेळेत खर्च होऊन होणाऱ्या विकासकामांचा शहरवासीयांना उपयोग होणे गरजेचे आहे. त्यासाठी ज्यांच्याकडे पालिकेची सत्ता आहे त्यांच्याकडे विकासाची मानसिकता असणे देखील महत्वाचे आहे.दुर्दैवाने हि मानसिकता मागील पाच वर्षात दिसून न आल्यामुळे शहरविकास रखडला आहे.व त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे.भविष्यात हि परिस्थिती बदलण्यासाठी येणाऱ्या कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्ता द्या शहराच्या रखडलेल्या विकासाला चालना मिळाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास उपस्थितांना त्यांनी दिला आहे.
यावेळी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,राजेंद्र वाकचौरे,अजीज शेख मेहमूद सय्यद,गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,रमेश गवळी,फकीर कुरेशी,दिनकर खरे,डॉ.तुषार गलांडे,सचिन परदेशी,जावेद शेख,चंद्रशेखर म्हस्के,कार्तिक सरदार,वाल्मिक लहिरे,भाग्यश्री बोरुडे,बाळासाहेब रुईकर,अशोक आव्हाटे,राजेंद्र आभाळे,नारायण लांडगे,आकाश डागा,दिनेश पवार,महेश उदावंत,अक्षय आंग्रे,प्रदीप कुऱ्हाडे,योगेश वाणी,जुनेद शेख,प्रसाद उदावंत,रामदास केकाण,दिपक जगताप,डॉ.दिलीप जगताप,अमोल गिरमे,रामभाऊ वाघ,मनोज नरोडे,एकनाथ गंगूले,राजेंद्र शिंगी,बबनराव गिरमे,राजेंद्र सूर्यवंशी,उत्तमराव गिरमे,माणिक गंगूले,राकेश धाकतोडे,संजय नळे,इम्रान पठाण,दादा पोटे,गोकुळ नळे,खुदा पठाण,गणेश शिंदे,किरण बागुल,दिक्षा उनवणे,प्रियंका उनवणे,ऋषिकेश काळे,सोमनाथ आढाव,किशोर डोखे,दिलीप पोटे,विशाल जगताप,गणेश शेकटकर,अमोल वाघडकर,गणेश बोरुडे,संतोष शेजवळ,प्रतीक राऊत,आयुब कच्छी,दिपक केकाण,कुलदीप लवांडे,राहुल राठोड,रोहित वाघ,नानासाहेब नवले,नानासाहेब रोहोम,आदीं नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close